माळेगाव बु

‘माळेगाव कारखान्यालाच मोठ्या प्रमाणात ऊस देणार’; फलटणमधील गेटकेन उत्पादकांचा निर्धार

गोखळी-मंजवडी-टाकळ ओढ्यात गेटकेन ऊस उत्पादकांच्या बैठका

‘माळेगाव कारखान्यालाच मोठ्या प्रमाणात ऊस देणार’; फलटणमधील गेटकेन उत्पादकांचा निर्धार

गोखळी-मंजवडी-टाकळ ओढ्यात गेटकेन ऊस उत्पादकांच्या बैठका

बारामती वार्तापत्र 

आगामी गळीत हंगामाच्या पार्श्वभूमीवर माळेगाव सहकारी साखर कारखान्याने गेटकेन ऊस उत्पादक शेतकऱ्यांशी संपर्क वाढविण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून कारखान्याच्या वतीने फलटण तालुक्यातील गोखळी, मंजवडी आणि टाकळ ओढा येथील गेटकेनधारक ऊस उत्पादकांच्या बैठका घेण्यात आल्या.

या बैठकीदरम्यान ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी माळेगाव सहकारी साखर कारखान्याला प्राधान्याने मोठ्या प्रमाणात ऊस देणार असल्याचे उत्स्फूर्तपणे सांगितले. त्यामुळे आगामी गळीत हंगामासाठी माळेगाव कारखान्याला गेटकेन ऊस मिळविण्याच्या दृष्टीने सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.

कारखान्याच्या संचालक मंडळाच्या वतीने गेटकेन ऊस उत्पादकांशी प्रत्यक्ष संवाद साधत त्यांच्या अडचणी, अपेक्षा आणि ऊस पुरवठ्याबाबत चर्चा करण्यात आली. शेतकऱ्यांशी थेट संपर्क साधून ऊस उपलब्धतेचे नियोजन करण्यावर कारखाना प्रशासनाचा भर असल्याचे यावेळी दिसून आले.

या दौऱ्यामध्ये व्हाइस चेअरमन नितीनदादा शेंडे, संचालक विजयअप्पा तावरे, जयपालतात्या देवकाते, रतनदादा भोसले, सतीशअप्पा फाळके, देविदास गावडे, विशालभैय्या जगताप, तसेच शेतकी अधिकारी लिंभोरे साहेब आणि ओव्हरसिअर अनिल जगताप सहभागी झाले होते.

या बैठकींना गेटकेन ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा मिळालेला प्रतिसाद पाहता, आगामी गळीत हंगामासाठी माळेगाव कारखान्याच्या ऊस संकलनाला चांगली चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

Back to top button