राजकीय

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची जोरदार चर्चा;रोहित पवार यांचे मोठं विधान

मुलाखतीत रोहित पवार यांनी पार्थ यांना काही सल्ले देखील दिले आहेत.

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची जोरदार चर्चा;रोहित पवार यांचे मोठं विधान

मुलाखतीत रोहित पवार यांनी पार्थ यांना काही सल्ले देखील दिले आहेत.

बारामती वार्तापत्र 

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची जोरदार चर्चा आहे. अशातच शरद पवारांच्या राष्ट्रवादीने अजित दादांच्या राष्ट्रावादीसह भाजप सोबत जाण्याच्या निर्णय घेतला तर भाजप सोबत जाणार का असा प्रश्न रोहित पवारांना विचारण्यात आला.

भाजप सोबत जाण्याचा निर्णय झाला तर मी पवारांची माफी मागून वेगळा निर्णय घेईन असं मोठ वक्तव्य रोहित पवार यांनी केले आहे. झी 24 तासच्या ‘टू द पॉईंट विथ कमलेश सुतार’ या मुलाखतीत रोहित पवार यांनी स्पष्ट भूमिका मांडली. तसेच वेगळा निर्णय का घेणार याचे कारण देखील सांगितले.

शरद पवार, सुप्रिया सुळे भाजपसोबत जाणार नाहीत. गेल्यास मी पवारांची माफी मागून वेगळा निर्णय घेईल. टू द पॉईंटच्या विशेष मुलाखतीत रोहित पवारांनी मोठं विधान केले आहे. भाजपसोबत राहून विलीनकरण होणार असले तर पवार साहेब तयार होतील असे मला वाटत नाही. विलीनीकरणानंतर भाजप सोबत जाऊया अशी पक्षाची भूमिका असेल तर मला वेगळा निर्णय घ्यावा लागेल. पक्षाने भाजप सोबत जाण्याचा निर्णय घेतला तर मी सोबत जाणार नाही असे रोहित पवार यांनी स्पष्टपणे सांगितले.

2029 मध्ये बारामतीत पवार विरुद्ध पवार संघर्ष होईल असा प्रश्न रोहित पवार यांना विचारण्यात आला. विलीनीकरण झाले नाही तर 2029 मध्ये पवार विरुद्ध पवार असा संघर्ष होऊ शकतो. पवार आणि बारामती हे समीकरण कधीच बदलणार नाही. पवार आणि बारामती हे नात अतूट आहे.
या मुलाखतीत रोहित पवार यांनी पार्थ यांना काही सल्ले देखील दिले आहेत. जबाबदारी आली तर काही बदल करावे लागतात. आमदारांना विश्वासात घ्यावे.

अजित पवारांच्या जवळच्या लोकांना संधी द्यावी. सर्वांना संधी दिली सर्वांना न्याय मिळेल. अजित पवार तिथे असताना काही चिंता नव्हती. पण, आता बारामतीकरांच्या समस्या सोडवण्यासाठी पवार म्हणून बारामतीकरांच्या मदतीला धावून जाणार. 2029 मधून कर्जत जामखेड लढणार. युगेंद्र पवार चांगल काम करत आहेत. युगेंद्र पवार यांनी आणखी आक्रमक काम केल्यास बारामतीकर त्यांना स्विकारतील असं देखील रोहित पवार म्हणाले.

Back to top button