सोमय्या हल्ला प्रकरण | मुंबई महापालिकेच्या माजी महापौर यांना अटक
अधिकच्या तपासासाठी हा गुन्हा खार पोलिसांकडे वर्ग केला होता.

सोमय्या हल्ला प्रकरण | मुंबई महापालिकेच्या माजी महापौर यांना अटक
अधिकच्या तपासासाठी हा गुन्हा खार पोलिसांकडे वर्ग केला होता.
प्रतिनिधी
भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या गाडीवर काही दिवसांपूर्वी शिवसैनिकांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात सोमय्या जखमी झाले होते. दरम्यान आता या प्रकरणी पोलिसांनी मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना अटक केली आहे. खार पोलिसांनी आज साडे चार वाजण्याच्या सुमारास महाडेश्वर यांना अटक केली.
किरीट सोमय्या यांनी वांद्रे पोलिसांकडे हल्लाप्रकरणाचा जबाब नोंदवला होता. त्यानुसार वांद्रे पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. अधिकच्या तपासासाठी हा गुन्हा खार पोलिसांकडे वर्ग केला होता. खार पोलिस ठाण्याच्या अगदी गेटवर सोमय्यांवर हल्ला झाला होता. या हल्ल्याच्या मागील सूत्रधार कोण,हे शोधण्यासाठी पोलिसांवर मोठा दबाव होता. अखेर सोमय्या यांच्या हल्ला प्रकरणात महाडेश्वर यांना अटक केली आहे.