
बारामती मध्ये आज तीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण .
तर ४६ जणांचा अहवाल निगेटिव्ह.
बारामती:वार्तापत्र बारामती तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्या वाढत आहे आज बुधवार दि 29 जुलै रोजी 8 वाजून 30 मिनिटे ची कोरोना परिस्थिती खलील प्रमाणे
एकूण 53 नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते त्यापैकी 46 नमुन्यांचा अहवाल निगेटिव्ह आलेला असून तीन रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे व चार जणांचा अहवाल प्रतीक्षेत आहे पॉझिटिव आलेल्या तीन जणांमध्ये भीम नगर बारामती येथील तीस वर्षाची महिला तसेच पतंग शहा नगर येथील 25 वर्षाचा युवक व निरावागज येथील पन्नास वर्षाच्या पुरुषांचा समावेश आहे बारामतीमधील एकूण रुग्णांची संख्या 127 झालेली आहे त्यामधील 62 रुग्ण बरे झालेले आहेत व चोपन्न रुग्ण उपचार खाली आहेत एकूण अकरा मृत्यू झालेले आहेत.
तरी बाजारपेठ विनाकारण गर्दी करू नका सोशल डिस्टन्स पाळा मास्क वापरा सॅनिटायझेर चा वापर करा
असे आव्हान तालुका आरोग्य अधिकारी डॉ मनोज खोमणे यांनी केले आहे