स्थानिक

भिगवण अपहरण प्रकरण बारामती बंदला उस्फुर्त प्रतिसाद

आरोपींवर पॉक्सो (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून कठोर शिक्षा व्हावी

भिगवण अपहरण प्रकरण बारामती बंदला उस्फुर्त प्रतिसाद

आरोपींवर पॉक्सो (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून कठोर शिक्षा व्हावी

बारामती वार्तापत्र

इंदापूर तालुक्यातील भिगवण येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ आज बारामती शहरात बंद पाळण्यात आला. सकल हिंदू समाजाच्या वतीने या बंदचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला बारामतीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचे पाहायला मिळाले.

आज सकाळपासूनच बारामती शहरातील मुख्य बाजारपेठा, व्यापारी आस्थापना आणि विविध दुकाने बंद ठेवण्यात आली. शहरातील प्रमुख चौकांमध्ये सकल हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत भिगवण घटनेचा निषेध व्यक्त केला. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता.

सकल हिंदू समाजाने केलेल्या प्रमुख मागण्यांमध्ये भिगवण येथील संबंधित तरुणीला तात्काळ तिच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात यावे, तसेच या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. विशेषतः आरोपींवर पॉक्सो (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.

संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, संबंधित प्रकरणात प्रशासनाने तातडीने आणि पारदर्शक कारवाई करावी, अन्यथा पुढील काळात अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. दरम्यान, बारामती शहरात बंद शांततेत पार पडल्याचे समजते. नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने दुकाने बंद ठेवून या आंदोलनाला पाठिंबा दिला.

Check Also
Close
Back to top button