13 महापालिका निवडणुकांचं रणशिंग फुंकल्यात जमा,? या दिवशी आरक्षणासाठी सोडत
वॉर्ड निहाय आरक्षण सोडत काढण्याचे आदेश प्रसिद्ध करण्यात आले आहे.

13 महापालिका निवडणुकांचं रणशिंग फुंकल्यात जमा,? या दिवशी आरक्षणासाठी सोडत
वॉर्ड निहाय आरक्षण सोडत काढण्याचे आदेश प्रसिद्ध करण्यात आले आहे.
मुंबई : प्रतिनिधी
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाने येत्या 31 मे रोजी 13 प्रलंबित महापालिकांच्या प्रभागांचे आरक्षण सोडत काढली जाणार आहे. महापालिकांच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम 27 मे ते 13 जूनपर्यंत सुरू राहणार आहेत. ‘नवी मुंबई, वसई विरार, कल्याण-डोंबिवली, कोल्हापूर, ठाणे, उल्हासनगर, नाशिक, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, अमरावती, अकोला व नागपूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2022 आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.
येत्या 31 मे रोजी राज्यातील मुंबई वगळता इतर 13 महापालिकांच्या आरक्षण सोडत कार्यक्रम होमार आहे. मुंबई महापालिकेच्या आरक्षणाची सोडत ही नंतर जाहीर करण्यात येणार आहे.
राज्य निवडणुक आयोगाने आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर आगामी महापालिका निवडणुकांचं रणशिंग जवळ-जवळ फुंकल्यात जमा झालंय. राज्यात लवकरच नवी मुंबई, वसई-विरार, कल्याण-डोंबिवली, कोल्हापूर, ठाणे, उल्हासनगर, नाशिक, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, अमरावती, अकोला आणि नागपूर महानगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत. यामधील 13 महापालिकांच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम आयोगाकडून जाहीर करण्यात आला आहे.
राज्यातील ओबीसी आरक्षणाचा मुद्दा सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असून जोपर्यंत राज्य सरकार ओबीसी जनगणनेची त्रिस्तरीय चाचणी पूर्ण करीत नाही तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये नागरिकांच्या मागास वर्ग ( ओबीसी ) प्रवर्गासाठी प्रभाग राखीव ठेवता येत नाही . त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका ओबीसींच्या आरक्षांशिवाय होणार आहेत हे स्पष्ट झाले आहे