बारामती तालुकास्तरावर आज पासून ५ दिवस लसीकरण होणार..
आरोग्य मंत्री मा. राजेश टोपे यांनी सूचित केलेल्या मिशन कवच कुंडल कार्यक्रम अंतर्गत

बारामती तालुकास्तरावर आज पासून ५ दिवस लसीकरण होणार..
आरोग्य मंत्री मा. राजेश टोपे यांनी सूचित केलेल्या मिशन कवच कुंडल कार्यक्रम अंतर्गत
तालुकास्तरावर कोविशिल्ड लस उपलब्ध झाली आहे. उद्या रविवार दि. १० ते गुरूवार दि. १४ ऑक्टोबर २०२१ पर्यंत सलग ५ दिवस सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र व शहरातील केंद्रावर लसीकरण सत्राचे आयोजन करण्यात येणार आहे. १८ वर्ष वयावरील लाभार्थ्यांना पहिला डोस व दुसऱ्या डोस साठी (पहिला डोस घेऊन ८४ दिवस पूर्ण झालेले) लसीकरण करण्यात येईल. कृपया फक्त प्रलंबीत असलेल्या पात्र लाभार्थ्यांनी लस घेण्यासाठी सकाळी ९ वाजलेपासुन केंद्रावर हजर रहावे व लसीकरणाचा लाभ घ्यावा. इतरांनी लसीकरण सत्राच्या ठिकाणी गर्दी करु नये ही विनंती.
* लसिकरण केंद्र*
१) शाळा नं. ६-सिध्देश्वर गल्ली -बाबुजी नाईक मित्र मंडळ संपर्क-नगरसेवक सुनिल सस्ते, बा.न.प.
२) आबा गणपती मंडळ- तांदुळवाडी वेस चौक संपर्क-अध्यक्ष-श्रीकांत जाधव
३) शारदा प्रांगण-भिगवण चौक
४) प्राथमिक शाळा-माळेगांव कॉलनी. संपर्क- नगरसेवक सुरज सातव, बा.न.प.
५) शाळा क्र.२-कसबा, संपर्क- संतोष जगताप (नगरसेवक बा.न.प.)
६) महिला हॉस्पीटल -एमआयडीसी
७) फकरी फौंडेशन- तारा टॉकीज केंद्र, संपर्क-असगरअलीशेठ बोहरी नगरवाला
८) सहयाद्री सोशल फौंडेशन-शाह हायस्कूल, पाटस रोड संपर्क-अध्यक्ष, संभाजी माने
९) सहारा फौंडेशन- एकता इंग्लीश स्कूल,मोरगांव रोड ,संपर्क- परवेज सय्यद
१०) माता रमाई भवन-आमराई,बारामती संपर्क-नगरसेवक गणेशभाईजी सोनवणे .
डॉ. हेमंत नाझीरकर ,डॉ.मनोज खोमणे
मुख्य वैद्यकीय अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी, आरोग्य विभाग, पंचायत समिती बारामती शहर