माता रमाई आंबेडकर एक युगनिर्माती- नगरसेविका राजश्री मखरे
इंदापूर येथील जेतवन विहारात रमाई जयंती साजरी

माता रमाई आंबेडकर एक युगनिर्माती- नगरसेविका राजश्री मखरे
इंदापूर येथील जेतवन विहारात रमाई जयंती साजरी
इंदापूर : प्रतिनिधी
डाॅ. बाबासाहेब आंबेडकरनगर मधील जेतवन बुद्ध विहारात आज ( दि.७ ) रोजी माता रमाई आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
‘ जगाच्या इतिहासात प्रत्येक कर्तबगार पुरुषांच्या कर्तुत्वात त्यांच्या पाठीराख्या स्त्रीचा सहभाग मोलाचा असतो. डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सुखदुःखात सहभागी होणारी त्यांचे जीवन घडविणारी, त्यांना सदैव प्रोत्साहित करणारी आणि डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांना एक महान क्रांतियोद्धा बनविणारी माता रमाई आंबेडकर खरोखरच एक युगनिर्माती होत्या ‘ असे प्रतिपादन नगरसेविका राजश्री मखरे यांनी केले.
सुरुवातीला नगरसेविका तथा महिला विकास व बालकल्याण समिती सभापती राजश्री अशोक मखरे यांनी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. जेष्ठ महिला सरस्वती सोनवणे यांचे हस्ते रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दिपप्रज्वलन करण्यात आले. कुमारी विवेका मखरे हिने माता रमाई आंबेडकर यांचा जीवनपट सांगितला. माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येलाच आपले एक एकर जोमात आलेले ज्वारीचे शेत रानपाखरांसाठी राखून ठेवणा-या सरस्वती सोनवणे यांचा यथोचित सत्कार यावेळी करण्यात आला.
याप्रसंगी प्रा.अशोक मखरे, माजी नगरसेवक दादासाहेब सोनवणे, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब मखरे, अॅड. किरण लोंढे, रोहित ढावरे, अभिजित अवघडे,विशाल मखरे,सुरेश मखरे, धम्मपाल सरवदे,अक्षय मखरे, सुहास मखरे, उमेश ढावरे, दत्तात्रय शिंदे, विजय भंडलकर, राजू मखरे, संभाजी मखरे, अनार्य मखरे, विकी मखरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी महिलांची उपस्थित लक्षणीय होती. सरस्वती सोनवणे, हौसाबाई मखरे, उषा मखरे, पद्मिनी मखरे, वत्सला मखरे, मीना मखरे, तप्ताबाई मखरे, शारदा मखरे, वैशाली साबळे, शितल गाडे, उज्वला मखरे, आम्रपाली मखरे, जयमाला सोनवणे, प्रमिला मखरे, उमा मखरे, माया मखरे, अनिता मखरे, नंदा मखरे, रोहिणी मखरे, काजल लोंढे, शोभा मखरे, शैला मखरे, शोभा कांबळे, अश्विनी काकडे, ज्योती साबळे, प्रतिक्षा मखरे, करुणा मखरे, विवेका मखरे, सम्यका मखरे, अनुष्का काकडे, प्रज्ञा मखरे, समृद्धी मखरे, स्वरांजली मखरे, यशस्वी मखरे, आर्या मखरे, जिया मखरे, श्रेया गाडे, साक्षी मखरे इत्यादीची उपस्थिती होती.सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा.अशोक मखरे यांनी केले.