मुंबई

जेजुरीत दिलीप कुमार यांचं शुटिंग पाहण्यासाठी सायकलवरून गेलो होतो, शरद पवारांनी जागवल्या ट्रॅजेडी किंगच्या आठवणी!

पत्रकार परिषद घेऊन आपल्या मनातील भावनांना वाट मोकळी करून देतानाच दिलीप कुमार यांच्या आठवणींना उजाळा दिला.

जेजुरीत दिलीप कुमार यांचं शुटिंग पाहण्यासाठी सायकलवरून गेलो होतो, शरद पवारांनी जागवल्या ट्रॅजेडी किंगच्या आठवणी!

पत्रकार परिषद घेऊन आपल्या मनातील भावनांना वाट मोकळी करून देतानाच दिलीप कुमार यांच्या आठवणींना उजाळा दिला.

मुंबई: बारामती वार्तापत्र रिपोर्ट

जेजुरीत दिलीप कुमार यांचं शुटिंग सुरू होतं. आम्हाला त्याची कुणकुण लागली. मग आम्ही मित्रांनी सायकली काढल्या आणि सायकलवरून प्रवास करत जेजुरी गाठली. त्यावेळी मला पहिल्यांदा लांबून का होईना दिलीप कुमार यांना पाहता आलं, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार सांगत होते. नंतर मी राजकारणात आलो. सरकारमध्ये विविध पदावर असताना दिलीप कुमार यांच्याशी माझा दोस्ताना झाला. ते लोकप्रिय आणि महान अभिनेते होतेच. पण माणूस म्हणूनही तितकेच ग्रेट होते, अशा शब्दात शरद पवार यांनी दिलीप कुमार यांच्याबाबतच्या आठवणी जागवल्या.

अभिनय सम्राट दिलीप कुमार यांचं निधन झाल्याची वार्ता वाऱ्यासारखी पसरल्याने संपूर्ण देश शोकसागरात बुडाला आहे. आपल्या मित्राच्या निधनाने शरद पवारही व्यथित झाले आहेत. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्या मनातील भावनांना वाट मोकळी करून देतानाच दिलीप कुमार यांच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांनी दिलीप कुमार यांना पहिल्यांदा पाहिल्याचा जेजुरीतील किस्साही सांगितला. देशाने एक महानायक गमावला आहे. त्यांच्या अनेक आठवणी माझ्याकडे आहेत. जेजुरीत शुटिंग सुरू होतं. त्यावेळी आम्ही तरुण होतो. दिलीप कुमार यांची क्रेझ होती. शुटिंगची आम्हाला कुणकुण लागल्यावर आम्ही थेट सायकलवरून जेजुरी गाठली. तेव्हा पहिल्यांदा दिलीप कुमार यांना लांबून पाहिलं. नंतरच्या काळात विधिमंडळात राज्य सरकारमध्ये मला काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर दिलीप कुमार आणि माझी मैत्री झाली. आमचं वेगळं नातं निर्माण झालं. माझ्या प्रत्येक निवडणुकीत ते माझा प्रचार करण्यासाठी एखाद दुसरी सभा घ्यायचे, असं पवार यांनी सांगितलं.

Related Articles

Back to top button