इंदापूर

घराच्या छताला गळफास घेऊन युवकाची आत्महत्या

डॉक्टरांनी तपासून मयत असल्याचे सांगितले.

घराच्या छताला गळफास घेऊन युवकाची आत्महत्या

डॉक्टरांनी तपासून मयत असल्याचे सांगितले.

निलेश भोंग : प्रतिनिधी

निमगाव केतकी येथील सोमनाथ सुभाष मिसाळ (वय 29 निमगाव केतकी ता. इंदापूर जि. पुणे) या युवकाने आपल्या राहत्या घरातील छताला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवार दिनांक 6 जुलै रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या आसपास घडली.
याबाबत कृष्णा आबा लोंढे यांनी पोलीस ठाण्यात खबर दिली असून सोमनाथ मिसाळ यास सरकारी दवाखान्यात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मयत असल्याचे सांगितले. पुढील तपास इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार अमोल खैरे करीत आहे.

Back to top button