क्राईम रिपोर्ट

थोड्याशा ओळखीच्या आधारे मित्राच्या पत्नीला अश्लिल स्वरुपाचे मेसेज; बारामती पोलिसांनी ‘त्या’ होमगार्ड बाबत विनयभंगाचा गुन्हा दाखल

बारामती शहर पोलीस ठाण्यात महिलांच्या प्रश्नांना अग्रक्रम देऊन ते तात्काळ सोडण्यात येणार आहेत.

थोड्याशा ओळखीच्या आधारे मित्राच्या पत्नीला अश्लिल स्वरुपाचे मेसेज; बारामती पोलिसांनी ‘त्या’ होमगार्ड बाबत विनयभंगाचा गुन्हा दाखल

बारामती शहर पोलीस ठाण्यात महिलांच्या प्रश्नांना अग्रक्रम देऊन ते तात्काळ सोडण्यात येणार आहेत.

क्राईम; बारामती वार्तापत्र

ओळख होवून एक-दोनदा भेट झाल्याचा गैरफायदा घेत होमगार्ड असलेल्या एका युवकाने थेट मित्राच्या पत्नीचा अश्लील फोटो तयार करून त्या विवाहितेला पाठवल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी बारामती शहर पोलिसांनी अभिजीत विजय हटकर या होमगार्डला अटक केली आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, बारामती तालुक्यातील माळेगाव बुद्रुक येथील अभिजीत हटकर हा होमगार्ड म्हणून कार्यरत आहे. त्याच्या एका मित्राने त्याला एक-दोनदा आपल्या घरी नेले. त्यावेळी त्याने या होमगार्डची आपल्या पत्नीशी ओळख करून दिली. त्यातूनच या होमगार्डने त्याच्या पत्नीचा मोबाईल क्रमांक मिळवला.

मोबाईल नंबर मिळवल्यानंतर त्याने मित्राच्या पत्नीचा फोटोही मिळवला. या फोटोशी छेडछाड करत त्याने अश्लील फोटो तयार करून तो मित्राच्या पत्नीला पाठवला. तसेच काही अश्लील मेसेजही त्याने पाठवले. या प्रकरणी संबंधित विवाहितेने बारामती शहर पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीनंतर या बहाद्दर होमगार्डवर गुन्हा दाखल करत त्याला तात्काळ अटक करण्यात आली. पोलिसांनी दाखवलेल्या खाक्यानंतर या होमगार्डने गुन्ह्याची कबुली दिली आहे.  पोलिस निरीक्षक सुनील महाडीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार गोपाळ ओमासे, पोलिस नाईक किरण कदम, अतुल जाधव यांनी ही कारवाई केली आहे. दरम्यान, या संदर्भात सायबर सेलद्वारेही तपास केला जाणार आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button