इंदापूर

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याहस्ते युवा शास्त्रज्ञ भीमाशंकर गुरव यांचा विशेष सत्कार

भीमाशंकर गुरव यांनी लहानपणापासूनच आपल्या बुद्धीची चुणूक दाखविली

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याहस्ते युवा शास्त्रज्ञ भीमाशंकर गुरव यांचा विशेष सत्कार

भीमाशंकर गुरव यांनी लहानपणापासूनच आपल्या बुद्धीची चुणूक दाखविली

इंदापूर : प्रतिनिधी

अक्कलकोटचे सुपुत्र आणि सध्या डीआरडीओ पुणे येथे संयुक्त संचालक पदावर कार्यरत असलेले युवा वैज्ञानिक भीमाशंकर गुरव यांना केंद्र सरकारच्या वतीने दिला जाणारा यंग सायंटिस्ट ऑफ द इयर पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा राज्यमंत्री दत्तात्रय भरणे व वालचंदनगर कंपनीचे व्यवस्थापक धीरज केसकर यांच्या हस्ते छोटेखानी कार्यक्रमात सत्कार करण्यात आला.प्रसंगी राज्यमंत्री भरणेंनी गुरव यांचे तोंडभरून कौतुक केले.

भीमाशंकर गुरव यांनी लहानपणापासूनच आपल्या बुद्धीची चुणूक दाखविली होती. महाविद्यालयीन शिक्षण झाल्यानंतर केरळ येथे वैज्ञानिक क्षेत्रातील पदवी घेतली. त्यांचे बुद्धिकौशल्य पाहून डीआरडीओने त्यांना नोकरीची संधी दिली. या संधीचे सोने करीत गुरव यांनी वैज्ञानिक क्षेत्रातील नवनवीन तंत्र विकसित करून संरक्षण क्षेत्रात नावलौकिक मिळविला आहे. त्यांना डीआरडीओचे संयुक्त संचालक पद देण्यात आले. त्यांनी संरक्षण क्षेत्रात भेदक डिझाईन तयार केले, याची नोंद संरक्षण दलाने घेतली. त्यामुळे त्यांना यंग सायंटिस्ट ऑफ द इयर म्हणून गौरविले.

यावेळी वालचंदनगर इंडस्ट्रीज कंपनीचे वरिष्ठ व्यवस्थापक धीरज केसकर, राहुल माने, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी मोहन यादव, जेष्ठ पत्रकार अतुल तेरखडकर, वालचंदनगरचे सरपंच कुमार गायकवाड, कळंबच्या सरपंच विद्या सावंत, श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ वालचंदनगरचे अध्यक्ष रमेश देशपांडे, सचिव अमोल राजपूत, सहकारी पुरवठा भांडार संस्थेचे सचिव सुनील साबळे आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button