पुणे

राजकीय वर्तुळात चर्चां,भाजपचे खासदार उदयनराजे भोसले हे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या भेट

या भेटीत नगरपालिकेच्या हद्दवाढी नंतर सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यासंदर्भात चर्चा झाली.

राजकीय वर्तुळात चर्चां,भाजपचे खासदार उदयनराजे भोसले हे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या भेट

या भेटीत नगरपालिकेच्या हद्दवाढी नंतर सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यासंदर्भात चर्चा झाली.

पुणे: प्रतिनिधी

राजकीय वर्तुळातून आताची सर्वात मोठी बातमी येत आहे. भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली. उदयनराजे आणि उपमुख्यमंत्री यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना मोठं उधाण आलं आहे.

कामानिमित्त भाजप खासदार उदयनराजे भोसले उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेट घेतल्याची माहिती उदयनराजे यांनी दिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेले उदयनराजे भोसले  हे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत. पुण्यातील सर्किट हाऊसमध्ये उदयनराजे आणि अजित पवार यांच्यात बैठक सुरू आहे. उदयनराजे आणि अजित पवारांच्या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

खासदार उदयनराजे भोसले हे काही वेळापूर्वीच सर्किट हाऊसमध्ये दाखल झाले. उदयनराजे हे अजित पवारांच्या भेटीला पोहोचल्याने विविध चर्चा सुरू झाल्या आहेत. मात्र, आपण कामासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांना भेटण्यासाठी आलो असल्याचं खासदार उदयनराजे भोसेले यांनी सांगितलं आहे.

काय घडलं बैठकीत?

उपुमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतल्यावर खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रासारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. उदयनराजे भोसले म्हणाले, अजितदादांसोबत विकासकामांबाबत सकारात्मक चर्चा झाली.

वाईन विक्रीच्या निर्णयाबाबत उदयनराजे भोसले यांनी म्हटलं, वाईन विक्रीचा निर्णय का घेतला हे सरकारलाच विचारा. प्रत्येक व्यक्ती हा स्वतंत्र असतो त्यामुळे काय घ्यायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. शेवटी हेल्थ इज वेल्थ.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार का? या प्रश्नावर उदयनराजे भोसले यांनी सूचक उत्तर देत म्हटलं, जसा सर्वधर्म समभाव तसाच सर्व पक्ष समभाव मी मानतो.

शिवेंद्रराजेंना चेकमेट?

तसेच नगरपालिकेच्या इतर विषयांवर सुद्धा या भेटीत चर्चा करण्यात आली. मात्र उदयनराजे भोसले यांनी घेतलेल्या भेटीबद्दल साताऱ्यात चांगलीच राजकीय चर्चा सुरु झाली असून आमदार शिवेंद्रराजेंना चेकमेट देण्यासाठी उदयनराजेंनी ही भेट घेतल्याचं बोललं जात आहे. येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने दोन्ही राजे एकमेकांच्या विरोधात प्रयत्न करताना पहायला मिळत आहेत. त्यामुळे पवार-राजे यांच्या भेटीला अधिक महत्त्व आलं आहे.

जी शिवरायांची भूमिका तिच माझी

तब्बल तासाभराच्या भेटीनंतर उदयनराजे यांनी मीडियाशी संवाद साधला. साताऱ्यातील विकास कामांसंदर्भात ही भेट घेण्यात आली. प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्र्यांनी दिलं आहे. त्यामुळे प्रश्न मार्गी लागतील, असा विश्वास उदयनराजे यांनी व्यक्त केला. त्यानंतर त्यांना राष्ट्रवादीत प्रवेश करणार का? असा सवाल करण्यात आला. त्यावर शिवाजी महाराजांनी जशी भूमिका मांडली होती सर्व धर्म समभावाची तशीच माझी भूमिका आहे. सर्व पक्ष समभाव यावर माझा विश्वास आहे, असं म्हणत उदयनराजे यांनी चर्चेचं रान मोकळं करून दिलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

बारामती वार्तापत्र च्या ताज्या बातम्या "WhatsApp", व "Telegram" वर पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.

Join What's App

Join Telegram