इंदापूर

राष्ट्रशाहीर अमर शेख स्मृतिप्रीत्यर्थ इंदापूरमध्ये उद्या खुले कवी संमेलन

राज्यव्यापी पुरस्काराने दहा नामवंताचा होणार सन्मान

राष्ट्रशाहीर अमर शेख स्मृतिप्रीत्यर्थ इंदापूरमध्ये उद्या खुले कवी संमेलन

राज्यव्यापी पुरस्काराने दहा नामवंताचा होणार सन्मान

इंदापूर : प्रतिनिधी

राष्ट्रशाहीर अमर शेख स्मृतिप्रीत्यर्थ रविवारी (दि.१२) भिमानिरा विकास संस्था, विश्वभारती प्रकाशन यांच्याकडून खुले कवी संमेलन व राज्यव्यापी राष्ट्रशाहीर अमर शेख पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन अल्पबचत सभागृह पंचायत समिती इंदापूर या ठिकाणी दुपारी ४ वाजता करण्यात आले आहे.

याप्रसंगी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या दहा नामवंताना राष्ट्रशाहीर अमर शेख या राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

सदरील कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ साहित्यिक,अक्षर मानव चळवळ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजन खान हे असणार आहेत, तर कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष भरत शहा यांची विशेष उपस्थिती असणार आहे.कार्यक्रमाचे अध्यक्ष साथी सलीम शेख हे असून महेश स्वामी, शैलेश काटे, गफूरभाई सय्यद, प्रभा दाणी, खैरुन्निसा शेख, ज्योती गायकवाड, संदीपान कडवळे, हनुमंत कांबळे, अरुण होळकर, कवी रामदास देवकर, अकबर शेख, रमेश शिंदे, अख्तर शेख यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

Related Articles

Back to top button