घृणास्पद! बारामती तालुक्यातील विद्यार्थिनीवर बलात्कार; व्हिडिओ काढून पीडितेला धमकावले;आरोपी अटकेत
जेजुरी येथील ब्रम्हांड लाँजवर नेले
घृणास्पद! बारामती तालुक्यातील विद्यार्थिनीवर बलात्कार; व्हिडिओ काढून पीडितेला धमकावले;आरोपी अटकेत
जेजुरी येथील ब्रम्हांड लाँजवर नेले
क्राईम;बारामती वार्तापत्र
बारामती तालुक्यातील मोरगाव येथील अल्पवयीन मुलीला शाळेतून जेजुरीतील लॉजवर नेत तिचे नग्न अवस्थेतील फोटो व व्हिडिओ काढत तिच्यावर बलात्कार केल्याची घटना घडली.
याप्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिसांनी प्रदीप बाळासो शिंदे (रा. तरडोली, ता. बारामती) या आरोपीला अटक केली.
पीडीत मुलीच्या कुटुंबियानी याप्रकरणी फिर्याद दाखल केली. पोलिसांनी शिंदे याच्या विरोधात अपहरण, बलात्कार तसेच बाललैंगिक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. ११ जून ला ही घटना घडली.
मोरगाव येथील मयुरेश्वर विद्यालय येथे शाळेत गेली असता आरोपी याने फिर्यादीची मुलगी हि अल्पवयीन आहे हे माहित असुन सुद्धा फिर्यादीच्या संमतीशिवाय मुलगी हिस त्याचे माटार सायकलवर जबरदस्तीने बसवुन जेजुरी येथील ब्रम्हांड लाँजवर घेवुन जावुन तिचे जबरदस्तीने कपडे काढुन तिचे अर्धनग्न अवस्थेतील फोटो व व्हिडीओ काढुन तिचे सोबत बळजबरीने शारीरीक संबंध केला व कोणास काहीही सांगीतले तर फोटो व व्हिडीओ सर्वांना पाठविल अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.