शैक्षणिक

महाराष्ट्र युवा महोत्सव २०२४ मध्ये तुळजाराम चतुरचंद महाविदयालयातील सांस्कृतिक विभागाने सामूहिक लोकनृत्यामध्ये प्रथम क्रमांक

महाराष्ट्र युवा महोत्सव २०२४ मध्ये तुळजाराम चतुरचंद महाविदयालयातील सांस्कृतिक विभागाने सामूहिक लोकनृत्यामध्ये प्रथम क्रमांक

बारामती वार्तापत्र

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सोलापूर आयोजित केलेल्या विभागीय महाराष्ट्र युवा महोत्सव २०२४ मध्ये तुळजाराम चतुरचंद महाविदयालयातील सांस्कृतिक विभागाने सामूहिक लोकनृत्यामध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.

सांस्कृतिक विभागातील विद्यार्थ्यांनी यापूर्वी पुणे जिल्ह्याचे प्रथम क्रमांक प्राप्त पारितोषिक प्राप्त केले होते.

प्राप्त झालेल्या यशाबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे,  सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.भीमराव तोरणे, सोमनाथ कदम, प्रयाग खुळे यांचे संस्थेचे अध्यक्ष जवाहर शाह वाघोलीकर, सचिव मिलिंद शाह वाघोलीकर, प्राचार्य डॉ.अविनाश जगताप,  प्राध्यापक, शिक्षक, कर्मचारी यांचे वतीने हार्दिक अभिनंदन केले आहे.

Related Articles

Back to top button