स्थानिक

भारत बंद मुळे बारामती मुख्य यार्ड वरील भुसार लिलाव गुरूवार ऐवजी शुक्रवारी

गुरूवार दि. २४/४/२०२५ ऐवजी शुक्रवार दि. २५/४/२०२५ रोजी विक्रीस आणावा.

भारत बंद मुळे बारामती मुख्य यार्ड वरील भुसार लिलाव गुरूवार ऐवजी शुक्रवारी

गुरूवार दि. २४/४/२०२५ ऐवजी शुक्रवार दि. २५/४/२०२५ रोजी विक्रीस आणावा.

बारामती वार्तापत्र 

सकल जैन संघटनेने मुंबई येथील श्री पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर विटंबना या प्रकाराचा निषेध नोंदवण्यासाठी दि. २४/४/२०२५ रोजी संपुर्ण भारतभर भारत बंद ची हाक दिली आहे. या पार्श्वभूमीवर सकल जैन समाज, बारामती यांच्या वतीने बारामती बंद ठेवण्यात येणार आहे.

त्यामुळे गुरूवार दि. २४/४/२०२५ रोजी बारामती मुख्य यार्ड वरील भुसार व गुळ लिलाव बंद राहतील अशी माहिती समितीचे सभापती विश्वास आटोळे व उपसभापती रामचंद्र खलाटे यांनी दिली.

शेतकरी बंधुंनी याची नोंद घेऊन आपला शेतमाल गुरूवार दि. २४/४/२०२५ ऐवजी शुक्रवार दि. २५/४/२०२५ रोजी विक्रीस आणावा. बारामती मर्चन्ट असोसिएशन यांनी पत्राने कळविले नुसार सदर लिलाव शुक्रवारी ठरलेल्या वेळेत सुरू होतील अशी माहिती सचिव अरविंद जगताप यांनी दिली.

Back to top button

दिवंगत लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..! त्यांच्या कार्याला, दूरदृष्टीला आणि जनसेवेच्या अविस्मरणीय योगदानाला सादर प्रणाम.

https://youtu.be/y0HjjzvjpNM?si=ZKAYhb_IBjh73M7D