स्थानिक

बारामतीतील सहयोग निवासस्थानी शरद पवारांनी जोडले हात, सुनेत्रा पवारांचे अश्रू अनावर; भावूक करणारा क्षण व्हिडिओ 

कुटुंबातील इतर सदस्यही हुंदक्यांनी गहिवरले.

बारामतीतील सहयोग निवासस्थानी शरद पवारांनी जोडले हात, सुनेत्रा पवारांचे अश्रू अनावर; भावूक करणारा क्षण व्हिडिओ 

कुटुंबातील इतर सदस्यही हुंदक्यांनी गहिवरले.

बारामती वार्तापत्र

बारामतीतील सहयोग निवासस्थानी आज अत्यंत भावनिक वातावरण पाहायला मिळाले. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी येथे राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना भावपूर्ण आदरांजली वाहिली.

या प्रसंगी संपूर्ण पवार कुटुंब उपस्थित होते आणि प्रत्येकाच्याच डोळ्यांत अश्रू तरळत होते. कुटुंबातील हा हळवा क्षण उपस्थित सर्वांनाच अंतर्मुख करणारा ठरला.

गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य विलिनीकरणाबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू असून, दोन्ही गटांतील नेत्यांकडून परस्पर दावे-प्रतिदावे केले जात आहेत. अशा पार्श्वभूमीवर बुधवारी सायंकाळी शरद पवार हे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेण्यासाठी बारामतीत दाखल झाले.

त्यांच्या समवेत पत्नी प्रतिभा पवार, राजेंद्र पवार आणि आमदार रोहित पवार हेही होते. सहयोग सोसायटीतील निवासस्थानी पोहोचल्यानंतर त्यांनी कुटुंबीयांची भेट घेतली. निवासस्थानाच्या समोर अजित पवार यांचा पुष्पहार अर्पण केलेला मोठा फोटो लावण्यात आला होता. शरद पवार यांनी त्या ठिकाणी पुष्प वाहून आदरांजली अर्पण केली. दादांचे दर्शन घेताना त्यांनी हात जोडले आणि त्या क्षणी संपूर्ण वातावरण शोकाकुल झाले. सुनेत्रा पवार यांच्या डोळ्यांतून अश्रूंचा पूर वाहू लागला, तर अजित पवार यांच्या भगिनी आणि कुटुंबातील इतर सदस्यही हुंदक्यांनी गहिवरले. पवार कुटुंबातील सुना देखील भावनांना आवर घालू शकल्या नाहीत. या दृश्याने उपस्थित प्रत्येक जण भारावून गेला होता.

Back to top button