स्थानिक

बारामतीत सुनेत्रा पवारांचा पहिलाच जनता दरबार; नागरिकांची मोठी गर्दी

माळेगाव साखर कारखान्याच्या संचालकांची बैठक, वहिनी चेअरमन होणार?

बारामतीत सुनेत्रा पवारांचा पहिलाच जनता दरबार; नागरिकांची मोठी गर्दी

माळेगाव साखर कारखान्याच्या संचालकांची बैठक, वहिनी चेअरमन होणार?

बारामती वार्तापत्र 

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज पहिल्यांदाच बारामतीत जनता दरबार घेत आहेत. सुरुवातीला माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या संचालकांची बैठक घेतील. त्यानंतर जनता दरबार घेणार आहेत.

उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा अजितदादा पवार (DCM Sunetra Pawar) यांच्या बारामतीतील पहिल्याच जनता दरबाराला लोकांची गर्दी जमली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला, त्यानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, त्यानंतर आता सुनेत्रा पवार (DCM Sunetra Pawar) यांनी कामाला, बैठकांना सुरूवात केली आहे. आज त्या बारामतीत आहेत, आज माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या संचालकांची बैठक होत आहे, त्याचबरोबर जनता दरबार देखील होत आहे.

अजित पवारांच्या पावलावर पाऊल टाकत सुनेत्रा पवार यांनी बारामतीतील सहयोग यांनी निवासस्थानी जनता दरबार घेतला. यावेळी नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचंही पाहायला मिळालं आहे.

Back to top button