बारामतीत शिवजयंती साधेपणाने साजरी, दिवंगत अजितदादा यांनी वाहिली श्रद्धांजली
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आदरांजली वाहण्यात आली.

बारामतीत शिवजयंती साधेपणाने साजरी, दिवंगत अजितदादा यांनी वाहिली श्रद्धांजली
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आदरांजली वाहण्यात आली.
बारामती वार्तापत्र
शहरात शिवजयंतीनिमित्त अनेक उपक्रमांचे साधेपणाने आयोजन केले गेले. कसब्यातील श्री छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथील श्री छत्रपती शिवाजी महाराजंच्या पुतळ्यास बारामतीतील मान्यवरांनी शिवजयंतीनिमित्त अभिवादन केले.
या प्रसंगी नगराध्यक्ष सचिन सातव, उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष सुनील शिंदे, उपनगराध्यक्षा श्र्वेता नाळे, मुख्याधिकारी पंकज भुसे, पोलिस निरिक्षक श्रीशैल्य चिवडशेट्टी, गटनेते संजय संघवी या प्रसंगी उपस्थित होते. येथील जिजाऊ भवन येथे बारामती तालुका मराठा सेवा संघ व जिजाऊ सेवा संघाच्या वतीने शिवरायांना वंदन करण्यात आले. पारंपरिक पद्धतीने पाळणा म्हणून महिलांनी महाराजांना अभिवादन केले.
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आदरांजली वाहण्यात आली. या प्रसंगी नगराध्यक्ष सचिन सातव, उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, तहसीलदार स्वप्नील रावडे, मुख्याधिकारी पंकज भुसे, नगरसेवक सुनील सस्ते, ऍडव्होकेट अजित शिरकर, सुनील शिंदे, तालुका मराठा सेवा संघाचे नामदेव तुपे, जिजाऊ महिला संघाच्या अध्यक्षा स्वाती ढवाण, बारामती बँकेचे अध्यक्ष ॲड. शिरीष कुलकर्णी, फैय्याज शेख, दीपक पेशवे, विनोद पवार, नगरसेवक नवनाथ बल्लाळ, नगरसेवक अमर धुमाळ, नगरसेवक अभिजीत जाधव, नगरसेवक अभिजीत चव्हाण, नगरसेवक अल्ताफ सय्यद, सामाजिक कार्यकर्ते संभाजी माने, नाना शेळके,धनंजय जामदार, व नगरसेवक महिला देखील मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
छत्रपती शाहू हायस्कूलमध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे, तसेच कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन केले. या प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक जी. आर. तावरे, उपमुख्याध्यापक एम. बी. आगम, पर्यवेक्षक एन. व्ही. परदेशी,ज्येष्ठ शिक्षक एस. एन. उपस्थित होते.






