बारामती नगरपालिकेची घरपट्टी पाणीपट्टी गाळा भाडे वसुली करण्यात सुरुवात
अंतिम 24 तासांची नोटीस

बारामती नगरपालिकेची घरपट्टी पाणीपट्टी गाळा भाडे वसुली करण्यात सुरुवात
अंतिम 24 तासांची नोटीस
बारामती वार्तापत्र
बारामती नगर परिषद यांनी शहरातील महसूल वसुलीला गती देण्यासाठी घरपट्टी, पाणीपट्टी तसेच जागा (गाळा) भाडे विभागामार्फत विशेष मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत जानेवारी 2026 पासून थकबाकीदार गाळेधारकांना पाणीपट्टी घरपट्टी पंधरा दिवसांच्या मुदतीची नोटीस देऊन थकीत रकमेचा भरणा करण्याबाबत सूचना करण्यात आल्या होत्या.
प्रशासनाने त्यानंतरही अंतिम 24 तासांची नोटीस बजावून संबंधित गाळेधारकांना वैयक्तिक भेटी देत थकीत भाडे भरण्याबाबत वारंवार सूचना केल्या. मात्र, काही गाळेधारकांनी याकडे दुर्लक्ष केल्याने अखेर संबंधित गाळ्यांवर सील करण्याची कारवाई आजपासून सुरू करण्यात आली आहे.
आज, शुक्रवार दिनांक 20 फेब्रुवारी 2026 रोजी नगरपरिषद मालकीच्या धोंडीबा आबाजी सातव उद्योग भवन तसेच यशवंतराव चव्हाण उद्योग भवन येथील एकूण 1,74,940/- रुपयांची थकबाकी असलेल्या गाळ्यांना सील करण्यात आले आहे. ही कारवाई महसूल वसुली मोहिमेचा एक भाग असून पुढील काळातही थकबाकीदारांवर अशीच कठोर पावले उचलली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान,उर्वरित थकीत भाडे असलेल्या सर्व गाळेधारकांना नगरपरिषदेच्या वतीने जाहीर आवाहन करण्यात आले आहे की, त्यांनी आपली थकीत तसेच चालू भाडे रक्कम तात्काळ भरून प्रशासनास सहकार्य करावे. अन्यथा गाळा सील करून जप्त करण्याची तसेच संबंधित गाळ्यांचा फेर लिलाव करण्याची कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.






