बारामती शहर राष्ट्रवादीच्या शहर अध्यक्ष अनिता गायकवाड यांचा राजीनामा?
राष्ट्रवादी कार्यालयात वाढदिवस साजरा केल्याचा प्रकार भोवला

बारामती शहर राष्ट्रवादीच्या शहर अध्यक्ष अनिता गायकवाड यांचा राजीनामा?
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे दिला असल्याची चर्चा
राष्ट्रवादी कार्यालयात वाढदिवस साजरा केल्याचा प्रकार भोवला
बारामती वार्तापत्र
बारामती तालुक्यात राजकीय वर्तुळात सध्या एकच चर्चा रंगली आहे. अजित पवार गटाच्या महिला अध्यक्षा अनिता गायकवाड यांनी दिलेला राजीनामा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे दिला असल्याची माहिती समोर येत असून, या घडामोडींमुळे स्थानिक पातळीवर विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बारामती शहरातील राष्ट्रवादीच्या कार्यालयात अलीकडेच एका महिलेचा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. हा कार्यक्रम साध्या पद्धतीने आयोजित करण्यात आला असला तरी त्यावरून राजकीय वातावरण तापले. विशेषतः पक्षातील काही पदाधिकाऱ्यांनी यावर आक्षेप घेतल्याची चर्चा आहे.
दरम्यान,दिवंगत उपमुख्यमंत्री पाहिलेल्या अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले असल्याने अजूनही बारामतीतील नागरिक या दुःखातून सावरले नाहीत.तरी अशा प्रकारचा वाढदिवस साजरा करणे अयोग्य ठरल्याचे मत काही कार्यकर्त्यांनी व्यक्त केले. या पार्श्वभूमीवर महिला अध्यक्षा अनिता गायकवाड यांच्यावर दबाव वाढल्याचे सांगितले जाते.
याच कारणामुळे त्यांचा राजीनामा दिला असल्याची चर्चा शहरात सुरू आहे.मात्र,पक्षाकडून अधिकृत भूमिका अद्याप स्पष्ट करण्यात आलेली नाही.
आगामी काळात पक्ष संघटनेत आणखी बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्यातील समन्वय,तसेच सार्वजनिक कार्यक्रमांचे नियोजन याबाबत पक्ष अधिक खबरदारी घेईल,अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.






