स्थानिक

स्व:अजित पवारांचा अपघात नव्हे घातपात झाल्याचा संशय, बारामतीमधील लोणी भापकर गाव बंद

केंद्रस्तरीय चौकशीची मागणी करण्यात आली

स्व:अजित पवारांचा अपघात नव्हे घातपात झाल्याचा संशय, बारामतीमधील लोणी भापकर गाव बंद

केंद्रस्तरीय चौकशीची मागणी करण्यात आली.

बारामती वार्तापत्र

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अपघात झाला नसून त्यांचा घातपात झाल्याचा संशय आहे. अजित पवारांचा अपघाताचा तपास व्हावा या मागणीसाठी बारामती तालुक्यातील लोणी भापकर गावात रविवारी कडकडीत बंद पाळण्यात आला.

लोणी भापकर ग्रामस्थांचा अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या चौकशीसाठी मृत्यूबाबत सखोल आणि पारदर्शक चौकशी व्हावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. अपघातातील ब्लॅक बॉक्स माहिती, सीसीटीव्ही फुटेज आणि संबंधित विमान कंपनीवर कारवाई करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. “हा केवळ अपघात नसून घातपात असू शकतो,” असा संशय व्यक्त करत केंद्रस्तरीय चौकशीची मागणी करण्यात आली. पंचक्रोशीतील नागरिक आणि कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत गाव बंद ठेवला असून न्याय मिळेपर्यंत लढा सुरू ठेवण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Back to top button