स्थानिक

स्व अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत चौकशीची मागणी; उद्या बारामतीत निवेदन

सकाळी १० वाजता प्रांत कार्यालय

स्व अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत चौकशीची मागणी; उद्या बारामतीत निवेदन

सकाळी १० वाजता प्रांत कार्यालय

बारामती वार्तापत्र 

राज्याचे ज्येष्ठ नेते आणि बारामतीच्या मातीचा अभिमान असलेले अजित पवार यांच्याबाबत विमान अपघातासंदर्भातील वृत्तांमुळे बारामती परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेबाबत विविध स्तरांवर चर्चा सुरू असून नागरिकांच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

या पार्श्वभूमीवर सत्य परिस्थिती लवकरात लवकर जनतेसमोर यावी, अपघातासंदर्भातील सर्व बाबींची निष्पक्ष, सखोल आणि जलदगतीने चौकशी व्हावी तसेच अधिकृत माहिती जाहीर करण्यात यावी, अशी मागणी बारामतीकरांकडून केली जात आहे. अफवा आणि अप्रमाणित माहितीमुळे संभ्रम निर्माण होऊ नये, यासाठी शासनाने स्पष्ट भूमिका मांडावी, अशीही अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

या मागण्यांसाठी नागरिकांच्या वतीने शासनाला निवेदन सादर करण्यात येणार आहे.सोमवार, दिनांक २३ फेब्रुवारी २०२६ सकाळी १० वाजता प्रांत कार्यालय, बारामती
सर्व बारामतीकर बंधू-भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शांततेत आणि कायद्याच्या चौकटीत राहून आपली भावना व्यक्त करावी. तसेच निष्पक्ष चौकशीची मागणी बळकट करावी,असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Back to top button