शैक्षणिक

तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात ‘निर्भय कन्या’ कार्यशाळा संपन्न

१५० विद्यार्थिनीनी आपला सहभाग नोंदवला.

तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात ‘निर्भय कन्या’ कार्यशाळा संपन्न

१५० विद्यार्थिनीनी आपला सहभाग नोंदवला.

बारामती वार्तापत्र 

बारामती: प्रत्येकाच्या जीवनात योगाला अनन्यसाधारण महत्व आहे. सर्व समस्यांवर योग हे सोल्युशन आहे.  श्वास, शरीर, विचार, मन यांची सांगड घालून निर्माण केलेली कृती म्हणजे योग. योगामुळे आपले आयुष्य सुंदर बनते असे प्रतिपादन शितल पराडे जगदाळे, योग प्रशिक्षक मिड ब्रेन ऍक्टिव्हेशन ट्रेनर, बारामती यांनी केले.

त्यांनी प्रात्यक्षिकाद्वारे योगाचे महत्व सांगितले. ‘आपण जसे आहोत तसे स्वीकारणे करणे’ या मंत्र देखील त्यांनी ‘योग आणि मी’ या विषयावर बोलताना दिला.

सबलीकरणाच्या टप्प्यावर समाजात महिला व मुली सुरक्षित असल्या पाहिजेत. ज्या समाजात महिला सुरक्षित असतील, तो समाज निकोप असल्याचे ते एक लक्षण असते असे प्रतिपादन त्यांनी केले.

ही कार्यशाळा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या, विद्यार्थी विकास मंडळ व तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय, बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती. मुलींची सुरक्षितता हा कार्यशाळेचा विषय होता.

या कार्यशाळेचे उद्घाटन महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.सचिन गाडेकर यांनी केले. अध्यक्षीय भाषणात बोलतांना ते म्हणाले की, विद्यार्थिनींनी आपल्या आजूबाजूच्या सर्व परिस्थिती बद्दल जागरूक असणे आवश्यक आहे. धैर्य बाळगले पाहिजे, अविरत संघर्ष करण्याची तयारी देखील असली पाहिजे.

शारीरिकदृष्ट्या सुदृढ असणे, साक्षर असणे, अनुभव इ. बाबी निर्भय बनण्यासाठी गरजेच्या आहेत , धाडसाने खंबीरपणे, कोणाच्याही मदतीशिवाय सामोरे जाण्याचे बळ येणे गरजेचे आहे. त्यांनी स्वतःला कधीही कमी समजू नये. स्वतःसाठी वेळ दिला पाहिजे असे मत त्यांनी मांडले.

मुली जोपर्यंत न्याय आणि समता यांचे अर्थ व महत्व समजून घेत नाहीत, तोपर्यंत त्यांचा आत्मविश्वास वाढणार नाही. मुली अथवा महिलांवर होणारे अत्याचार, हिंसा यामध्ये आपल्याच जवळची, विश्वासातली अथवा ओळखीची व्यक्ती असते. त्यामुळे मुलींनी सजग असणे गरजेचे आहे.

या कार्यशाळेसाठी शिवानी गणेश कदम, मुख्य प्रशिक्षक, बारामती गैंसीयु, कराटे, बारामती  बारामती  यांनी संकट प्रसंगी कशा पद्धतीने स्वसंरक्षण करावे कराटे ची प्रात्यक्षिके विद्यार्थी विद्यार्थिनींच्या मदतीने करून दाखवली. विद्यार्थिनींशी संवाद साधला. यावेळी बोलतांना त्या म्हणाल्या की, स्त्रीला तिच्या स्त्रीत्वावर हल्ला होईल याची सर्वाधिक भीती असते. मुली जोपर्यंत निर्भय होणार नाहीत, तोपर्यंत त्यांचा आत्मविश्वास वाढणार नाही. त्यांनी यावेळी सांगितले.

उद्घाटन कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचे स्वागत कार्यशाळा समन्वयक डॉ.सुनंदा शेळके  यांनी केले. यावेळी त्यांनी या कार्यशाळेच्या आयोजनामागील भूमिका मांडली. विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. भगवान माळी हे आवर्जून उपस्थित होते. पाहुण्यांचा परिचय सौ.सुषमा संगई, व प्रा.प्राजक्ता कुलकर्णी  यांनी करून दिला. आभार प्रा.प्रीती भोसले यांनी मानले तर सूत्रसंचालन डॉ.मेघा बडवे यांनी केले. ही कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अविनाश जगताप यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. तर समितीतील सर्व सदस्य यांनी कार्यशाळा आयोजित करण्यासाठी सहकार्य केले.  या कार्यशाळेत सुमारे १५० विद्यार्थिनीनी आपला सहभाग नोंदवला.

Back to top button