बारामतीतील विद्या प्रतिष्ठान मराठी माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांचे राज्यस्तरीय परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश
मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांच्या भावी शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा

बारामतीतील विद्या प्रतिष्ठान मराठी माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांचे राज्यस्तरीय परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश
मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांच्या भावी शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा
बारामती वार्तापत्र
विद्या प्रतिष्ठान मराठी माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी विविध राज्यस्तरीय स्पर्धा व परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
Diamond Talent Search Examination अंतर्गत दिनांक ७ जून २०२६ रोजी घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय इस्रो अंतराळ प्रदर्शन भेट परीक्षेत शाळेतील चि. वैष्णव लक्ष्मण चौधर (इ. ६ वी) व कु. स्वरांजली संजय पवार (इ. ७ वी) यांची निवड झाली आहे. या यशामुळे विद्यार्थ्यांना इस्रोच्या अंतराळ प्रदर्शनाला भेट देण्याची संधी मिळणार असून, विज्ञान व अंतराळ संशोधनाविषयी त्यांची जिज्ञासा अधिक वाढण्यास मदत होणार आहे.
याचबरोबर पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) २०२५-२६ मध्ये शाळेच्या विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळवत उल्लेखनीय यश मिळवले आहे. चि. विश्वजित प्रशांत पवार यांनी ३०० पैकी २४८ गुण, चि. वैष्णव लक्ष्मण चौधर यांनी २४२ गुण, तर कु. शर्वरी अजित निकम यांनी २४० गुण मिळवून शाळेचे नाव उज्ज्वल केले आहे.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक सौ. मलगुंडे,श्री.सचिन चव्हाण ,सौ नेवसे, सौ. चौधर पी ,सौ कुदळे,सौ.जाधव एच ,श्री.पर्वते,श्री. परीक्षित चव्हाण यांचे संस्थेचे पदाधिकारी शाळेचे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालकांनी मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांच्या भावी शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.






