वसुंधरा शिवाजी शितोळे-भोसले यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएच.डी. प्रदान …
शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले

वसुंधरा शिवाजी शितोळे-भोसले यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएच.डी. प्रदान …
शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले
बारामती वार्तापत्र
तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय, बारामती येथील इंग्रजी विभागातील संशोधक – वसुंधरा शिवाजी शितोळे-भोसले यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएच.डी. पदवी जाहीर झाली आहे.
वसुंधरा शितोळे-भोसले यांनी मानव्यविज्ञान शाखेच्या इंग्रजी विषयात ‘Quest for Identity and Racial Discrimination in the Autobiographies of Maya Angelou : A Select Study’ या विषयावर संशोधन प्रबंध सादर केला. त्यांच्या या संशोधनासाठी विद्या प्रतिष्ठानच्या कमलनयन बजाज कॅालेज ॲाफ इंजिनियरिंगच्या डॉ. अनिल पाटील यांनी मार्गदर्शन केले.
पीएच. डी. पदवी प्राप्त केल्याबद्दल प्राचार्य डॉ. अविनाश जगताप, उपप्राचार्य डॉ. सचिन गाडेकर, डॉ. योगिनी मुळे, डॅा. अरुण मगर, इंग्रजी विभागप्रमुख डॅा. अजय ढवळे, केंद्र समन्वयक – डॅा. सुशिल देशमुख, प्रबंधक – अभिनंदन शहा, महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. त्यांच्या या यशाबद्दल मित्रपरिवार आणि विद्यार्थ्यांनीही त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.
डॉ. वसुंधरा शितोळे-भोसले यांच्या या उल्लेखनीय संशोधनामुळे इंग्रजी साहित्यविषयक समीक्षेत नव्या दृष्टिकोनाची भर पडली आहे. त्यांच्या पुढील शैक्षणिक आणि संशोधन कार्यासाठी त्यांना समाजातील विविध स्तरातून शुभेच्छा दिल्या जात आहेत.






