बारामतीतील उप प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत शालेय बस विशेष तपासणी मोहिमेत १५ वाहनांवर कारवाई
६७ हजार ५०० रुपये दंडात्मक रक्कम वसूल

बारामतीतील उप प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत शालेय बस विशेष तपासणी मोहिमेत १५ वाहनांवर कारवाई
६७ हजार ५०० रुपये दंडात्मक रक्कम वसूल
बारामती वार्तापत्र
उप प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत शालेय बस विशेष तपासणी मोहिमेत बारामती, दौंड, इंदापूर तालुक्यातील ७७ शालेय बसेस तपासणी करुन नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दोषी १५ वाहनावर कारवाई करुन ६७ हजार ५०० रुपये दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली आहे.
या मोहिमेत योग्यता प्रमाणपत्र, विमा प्रमाणपत्र, प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (पीयुसी) तसेच मुदत संपलेल्या इतर कागदपत्रे व रस्ते सुरक्षा नियमांचे पालन न करणाऱ्या दोषी शालेय बसेसवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. तसेच मोटार वाहन निरीक्षक यांनी शाळांना भेटी देऊन शालेय बसेसच्या विधिग्राह्य नसलेल्या कागदपत्रांचे नुतनीकरण करणे, शालेय बस नियमावलीचे पालन करणे, रस्ता सुरक्षा वाहतूकीच्या नियमांचे पालन करण्याबाबत संबंधित शाळा व्यवस्थापक व वाहनचालकांना सूचना देण्यात आल्या आहेत.
विद्यार्थ्यांचे पालक आणि अन्य नागरिकांकडून केलेल्या मागणी विचारात घेता तपासणी मोहीम आयोजित करण्यात आली आहे.
विद्यार्थ्याच्या परीक्षा संपल्यानंतरही यापुढेही विशेष तपासणी मोहिम सुरुच राहणार आहे.
सर्व शालेय बस आणि इतर वाहनचालकांनी आपल्या वाहनांची सर्व कागदपत्रे अद्यावत करून घ्यावीत, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी सुरेंद्र निकम यांनी केले आहे.






