माळेगाव बु

अजित पवार यांच्या निधनानंतर माळेगावात शिवनगर प्रसारक मंडळातील कथित भ्रष्टाचारावरून चर्चा रंगली;कारवाई होणार का?

विशेषतःखासदार शरद पवार, सुप्रिया सुळे या प्रकरणात पुढाकार घेणार का, याकडेही अनेकांचे लक्ष लागले आहे.

अजित पवार यांच्या निधनानंतर माळेगावात शिवनगर प्रसारक मंडळातील कथित भ्रष्टाचारावरून चर्चा रंगली;कारवाई होणार का?

विशेषतःखासदार शरद पवार, सुप्रिया सुळे या प्रकरणात पुढाकार घेणार का, याकडेही अनेकांचे लक्ष लागले आहे.

बारामती वार्तापत्र

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकत्याच माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या जनरल सभेत केलेल्या वक्तव्यामुळे तालुक्यातील राजकीय व सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या सभेत बोलताना त्यांनी शिवनगर प्रसारक मंडळ मध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप करत तो उघड करण्याचा इशारा दिला होता.

सभेत उपस्थित असलेल्या सभासदांसमोर अजित पवार यांनी स्पष्टपणे सांगितले होते की, संबंधित प्रकरणातील सर्व बाबी तपासून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. त्यांच्या या विधानानंतर आता प्रत्यक्षात या कथित गैरव्यवहाराचा तपास कधी सुरू होणार आणि दोषींवर काय कारवाई होणार, याबाबत माळेगाव परिसरात मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान, काही ठिकाणी “राज्याच्या सत्तास्थानी असलेल्या नेतृत्वाकडून या प्रकरणाचा पाठपुरावा होईल का?” असा सवाल उपस्थित केला जात आहे. विशेषतःखासदार शरद पवार, सुप्रिया सुळे या प्रकरणात पुढाकार घेणार का, याकडेही अनेकांचे लक्ष लागले आहे.

माळेगाव सहकारी कारखान्याचे सभासद, स्थानिक नागरिक आणि संबंधित संस्थांशी निगडीत घटक यांच्यात या विषयावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. काही जणांनी तातडीने चौकशी करून सत्य बाहेर आणण्याची मागणी केली आहे, तर काहींनी राजकीय वक्तव्यांपलीकडे ठोस कृती होण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
एकूणच, शिवनगर प्रसारक मंडळातील कथित भ्रष्टाचार प्रकरण आता केवळ आरोप-प्रत्यारोपांपुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष कारवाईच्या दिशेने जाईल का, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. येत्या काळात शासन आणि संबंधित यंत्रणा यावर कोणती भूमिका घेतात,हेच या प्रकरणाचे पुढील चित्र स्पष्ट करणार आहे.

Back to top button