बारामती बस स्थानकात सवलत कार्डसाठी महिला व ज्येष्ठ नागरिकांची मोठी गर्दी
सकाळपासूनच बस स्थानक परिसरात रांगा

बारामती बस स्थानकात सवलत कार्डसाठी महिला व ज्येष्ठ नागरिकांची मोठी गर्दी
सकाळपासूनच बस स्थानक परिसरात रांगा
बारामती वार्तापत्र
बारामती शहरातील बस स्थानकात सवलत कार्ड मिळवण्यासाठी महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचे चित्र आज पाहायला मिळाले. राज्य परिवहन महामंडळाकडून देण्यात येणाऱ्या प्रवास सवलतींचा लाभ घेण्यासाठी नागरिकांची बस स्थानकात गर्दी झाली होती.
विशेषतःमहिला व ज्येष्ठ नागरिकांना प्रवासात सवलत मिळत असल्याने या कार्डसाठी मोठी उत्सुकता दिसून येत आहे.सकाळपासूनच बस स्थानक परिसरात रांगा लागल्या होत्या.अनेक नागरिकांनी तासन्तास उभे राहून आपला क्रमांक येण्याची प्रतीक्षा केली.
काही ठिकाणी व्यवस्थापन अपुरे पडत असल्याचेही दिसून आले. गर्दीमुळे नागरिकांना गैरसोयींचा सामना करावा लागला.उष्णतेमुळे ज्येष्ठ नागरिकांना त्रास सहन करावा लागल्याच्या तक्रारीही समोर आल्या. काही महिलांनी रांगेतील गोंधळ आणि माहितीच्या अभावाबद्दल नाराजी व्यक्त केली.
एकूणच,सवलत कार्डसाठी नागरिकांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेता प्रशासनाने अधिक सक्षम नियोजन करण्याची गरज असल्याचे स्पष्ट झाले आहे.






