स्थानिक

बारामती शहरातील हरीकृपानगरमधे रस्त्याच्या कडेला उभी नादुरुस्त ॲम्ब्युलन्स;वाहनचालक त्रस्त

वाहतुकीत अडथळा निर्माण

बारामती शहरातील हरीकृपानगरमधे रस्त्याच्या कडेला उभी नादुरुस्त ॲम्ब्युलन्स;वाहनचालक त्रस्त

वाहतुकीत अडथळा निर्माण

बारामती वार्तापत्र 

बारामती शहरातील हरीकृपानगर परिसरात गेल्या एक वर्षांहून अधिक काळ एक नादुरुस्त ॲम्ब्युलन्स बेवारस अवस्थेत उभी असल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे हा परिसर रुग्णालयांनी गजबजलेला असून येथे सतत रुग्णवाहिकांची व इतर वाहनांची मोठ्या प्रमाणावर ये-जा सुरू असते. अशा ठिकाणी ही बंद पडलेली ॲम्ब्युलन्स रस्त्याच्या कडेला उभी असल्याने वाहतुकीत अडथळा निर्माण होत आहे.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, संबंधित ॲम्ब्युलन्स कोणाची आहे याची माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही.ती दीर्घकाळापासून न हलविल्यामुळे तिची अवस्था अत्यंत खराब झाली असून परिसरात अस्वच्छता आणि गैरसोयीचे वातावरण निर्माण झाले आहे.तसेच आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिकांना मार्ग मोकळा मिळण्यात अडचणी येत असल्याचीही तक्रार नागरिकांनी व्यक्त केली आहे.

हरीकृपानगरमध्ये अनेक दवाखाने आणि क्लिनिक असल्याने येथे सतत गर्दी असते.अशा परिस्थितीत रस्त्याच्या कडेला उभी असलेली ही नादुरुस्त ॲम्ब्युलन्स अपघाताला आमंत्रण देऊ शकते,अशी भीतीही व्यक्त केली जात आहे.

संबंधित प्रशासनाने किंवा ज्यांची ही ॲम्ब्युलन्स असेल त्यांनी तत्काळ लक्ष घालून ही बेवारस ॲम्ब्युलन्स हटवावी आणि परिसरातील वाहतूकचा अडथळा दूर करावा,अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Back to top button