स्थानिक

बारामतीतील भिगवण रोडवरील दक्षिणमुखी हनुमान मंदिरात हनुमान जयंती उत्साहात साजरी

श्रद्धा आणि उत्साहाच्या वातावरणात पार पडला.

बारामतीतील भिगवण रोडवरील दक्षिणमुखी हनुमान मंदिरात हनुमान जयंती उत्साहात साजरी

, श्रद्धा आणि उत्साहाच्या वातावरणात पार पडला.

बारामती वार्तापत्र 

वैकुंठवाशी हभप भगवानराव बाबुराव तावरे यांनी स्थापित केलेल्या श्रीराम चौक, भिगवण रोड येथील दक्षिणमुखी हनुमान मंदिरात यंदाची हनुमान जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरी करण्यात आली. ‘नवसाला पावणारा मारुती’ अशी ख्याती असलेल्या या मंदिरात पहाटेपासूनच धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात झाली.

पहाटे लवकर मंदिरात अभिषेक व पूजेचा विधी पार पडला. वेदघोष आणि मंत्रोच्चारांच्या वातावरणात हनुमानाची विधिवत पूजा करण्यात आली. त्यानंतर आरती आणि प्रसाद वितरण करण्यात आले.

सकाळ होताच भाविकांनी दर्शनासाठी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. मंदिर परिसरात लांबच लांब रांगा लागल्या होत्या. महिला, युवक तसेच ज्येष्ठ नागरिकांनीही मोठ्या उत्साहाने दर्शन घेतले. अनेक भाविकांनी नवस फेडण्यासाठी आणि मनोकामना पूर्ण होण्यासाठी मारुतीरायाच्या चरणी प्रार्थना केल्या.

मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. स्वयंसेवकांकडून भाविकांच्या सोयीसाठी योग्य नियोजन करण्यात आले होते. दिवसभर भजन, कीर्तन तसेच धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

एकूणच, भिगवण रोडवरील या प्रसिद्ध हनुमान मंदिरात हनुमान जयंतीचा उत्सव भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाच्या वातावरणात पार पडला.

Back to top button