उर्मिला म्हेत्रे मराठी साहित्य परिषदेच्या अध्यक्ष पदी निवड
परिषदेचे कामकाज वाढीसाठी काम करणार

उर्मिला म्हेत्रे मराठी साहित्य परिषदेच्या अध्यक्ष पदी निवड
परिषदेचे कामकाज वाढीसाठी काम करणार
बारामती वार्तापत्र
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या बारामती शहर महिला अध्यक्ष पदी उर्मिला म्हेत्रे यांची निवड करण्यात आली.
रविवार दि.२९ मार्च रोजी बारामती येथील उर्मिला बलभीम म्हेत्रे यांची सामाजिक व साहित्य क्षेत्रातील भरीव योगदानाची दखल घेऊन अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद महिला शहराध्यक्ष बारामती पदी निवड करण्यात आली.
परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ शरद गोरे यांनी त्यांना नियुक्तीचे पत्र दिले आहे.
परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ शरद गोरे,राष्ट्रीय उपाध्यक्ष शुभांगीताई काळभोर यांच्या मार्गदर्शनाखाली त्या परिषदेचे कामकाज वाढीसाठी काम करणार आहेत.
त्यांच्या नियुक्तीमुळे बारामती शहरातील महिलांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी,मराठी भाषा संवर्धन,साहित्य परिषदेच्या माध्यमातून सामाजिक काम व मराठी भाषा संवर्धन साठी व्याख्यान माला चे आयोजन करणार असल्याचे उर्मिला म्हेत्रे यांनी सांगितले.






