राजकीय

जनरल निरीक्षक विद्यानंद सिंग आणि पोलीस निरीक्षक एन. कोलनची यांची बारामती पोटनिवडणूकीच्या मतदान केंद्रांना भेटी

निवडणूक विषयक कामकाज आणि तयारीचा घेतला आढावा

जनरल निरीक्षक विद्यानंद सिंग आणि पोलीस निरीक्षक एन. कोलनची यांची बारामती पोटनिवडणूकीच्या मतदान केंद्रांना भेटी

निवडणूक विषयक कामकाज आणि तयारीचा घेतला आढावा

बारामती वार्तापत्र

बारामती पोटनिवडणूकीच्या अनुषंगाने मतदारसंघाचे जनरल निरीक्षक श्री. विद्यानंद सिंग आणि पोलीस निरीक्षक श्री. एन. कोलनची यांनी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातील नामनिर्देशन कक्षाला भेट देवून उपलब्ध सर्व सुविधांची पाहणी केली तसेच निवडणुकीच्या सर्व तयारीचा आणि कामकाजाचा आढावा घेतला.

उमेदवारांना देण्यात येणारे नामनिर्देशन पत्र आणि त्या अनुषंगिक कागदपत्रांची पडताळणी केली. उमेदवारांना सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी उत्तम दिघे तसेच सह. निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार स्वप्नील रावडे यांनी करण्यात येणाऱ्या कामकाजाबाबत संपूर्ण माहिती दिली.
यानंतर मळद, गुणवडी, डोर्लेवाडी, मेखळी, जळगाव, कऱ्हावाघज, मोरगाव, तरडोली आदी मतदान केंद्राला भेट देवून पाहणी केली.

यावेळी दोन्ही निरीक्षकांनी मतदान केंद्रावरील वीज, पाणी, शौचालय, रॅम्प, संरक्षक भिंती इत्यादीची पाहणी केली. आणि नादुरुस्त असल्यास दुरुस्ती करून घेण्याच्या सूचना दिल्या.

मेखळी येथील एसएसटी पथकास भेट देऊन कामकाजाचा आढावा घेतला.

यावेळी बारामती शहरचे पोलीस निरीक्षक श्रीशैल्य चिवळशेट्टी, बारामती ग्रामीणचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस निरीक्षकाचे संपर्क अधिकारी आबा गाढवे जनरल निरीक्षकाचे संपर्क अधिकारी सुभाष पाटील सर्व मतदान केंद्र गावातील तलाठी उपस्थित होते.

Back to top button