बारामतीतील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी जय पवार यांचा पुढाकार; कसबा येथील राष्ट्रवादी कार्यालयात भेटी
पाणीपुरवठा, रस्ते, वीज तसेच इतर स्थानिक प्रश्न मांडले

बारामतीतील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी जय पवार यांचा पुढाकार; कसबा येथील राष्ट्रवादी कार्यालयात भेटी
पाणीपुरवठा, रस्ते, वीज तसेच इतर स्थानिक प्रश्न मांडले
बारामती वार्तापत्र
बारामती शहरातील कसबा परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कार्यालयात युवा नेते जय पवार यांनी नागरिकांच्या भेटी घेत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या अडचणी समजून घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला.
यावेळी विविध भागांतील नागरिकांनी पाणीपुरवठा, रस्ते, वीज तसेच इतर स्थानिक प्रश्न मांडले. जय पवार यांनी प्रत्येक नागरिकाची समस्या संयमाने ऐकून घेत संबंधित अधिकाऱ्यांमार्फत त्या सोडवण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.
“नागरिकांच्या अडचणी समजून घेऊन त्यावर तातडीने उपाययोजना करणे हे आमचे कर्तव्य आहे. प्रत्येक प्रश्न गांभीर्याने घेऊन तो मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू,” असे जय पवार यांनी सांगितले.
या उपक्रमामुळे नागरिकांना आपले प्रश्न थेट मांडण्याचे व्यासपीठ मिळाले असून स्थानिक पातळीवरील समस्या सोडवण्यासाठी सकारात्मक पाऊल उचलले जात असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.






