राजकीय

बारामतीतील सुनेत्रा पवार यांच्या मेळाव्याला नगरसेवक व पुढाऱ्यांची अनुपस्थिती? चर्चेला उधाण

विरोधकांकडूनही या मुद्द्याचा राजकीय फायदा घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

बारामतीतील सुनेत्रा पवार यांच्या मेळाव्याला नगरसेवक व पुढाऱ्यांची अनुपस्थिती? चर्चेला उधाण

विरोधकांकडूनही या मुद्द्याचा राजकीय फायदा घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

बारामती वार्तापत्र

बारामतीत आज पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. या निमित्ताने शहरात मोठ्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. पक्षाच्या ताकदीचे प्रदर्शन करण्यासाठी हा मेळावा महत्त्वाचा मानला जात होता. मात्र, या कार्यक्रमात अपेक्षेप्रमाणे स्थानिक पदाधिकारी, नगरसेवक आणि नगरसेविका यांची उपस्थिती कमी असल्याचे दिसून आले. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.

विशेष म्हणजे,अजितदादा पवार यांनी आपल्या कार्यकाळात बारामतीतील सर्व समाजघटकांना प्रतिनिधित्व मिळावे यासाठी मोठ्या प्रमाणावर पदवाटप केले होते. विविध जाती-जमातीतील कार्यकर्त्यांना संधी देत संघटन मजबूत करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. त्यामुळे पक्षाची स्थानिक पातळीवरील रचना भक्कम मानली जात होती.

अशा परिस्थितीत,इतक्या महत्त्वाच्या कार्यक्रमाला अनेक पदाधिकाऱ्यांची अनुपस्थिती खटकणारी ठरली. काहींनी ही अनुपस्थिती अंतर्गत नाराजीचे लक्षण असल्याची चर्चा सुरू केली आहे, तर काहीजण याला वैयक्तिक कारणे किंवा नियोजनातील त्रुटी जबाबदार असल्याचे सांगत आहेत.

दरम्यान,या घडामोडीमुळे आगामी पोटनिवडणुकीत संघटनात्मक एकजूट कितपत दिसून येईल, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विरोधकांकडूनही या मुद्द्याचा राजकीय फायदा घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे येत्या काळात पक्ष नेतृत्व या परिस्थितीवर कशी मात करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Back to top button