राजकीय

बारामती पोटनिवडणूक उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केला उमेदवारी अर्ज दाखल

"२ महिन्यांपूर्वी आम्ही लाडक्या नेत्याला गमावले.

बारामती पोटनिवडणूक उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केला उमेदवारी अर्ज दाखल

“२ महिन्यांपूर्वी आम्ही लाडक्या नेत्याला गमावले.

बारामती वार्तापत्र

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला.

अर्ज दाखल करण्यापूर्वी आयोजित सभेत सुनेत्रा पवार यांनी अजित पवार यांच्या स्मृतींना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. यावेळी अजितदादांच्या आठवणीने त्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले त्या भावूक होत म्हणाल्या की, “२ महिन्यांपूर्वी आम्ही लाडक्या नेत्याला गमावले. बारामती पोटनिवडणुकीचा अर्ज मी दाखल करत आहे. मला स्वप्नातही वाटलं नव्हतं की दादा आज नाहीत हे मला आजही मान्य नाही, पण नियतीने हा काळ आणला आहे.”

सुनेत्रा पवार यांनी आपल्या भाषणात अजित पवार यांच्या बारामतीशी असलेल्या घट्ट नात्यावर बद्दल सांगितले, त्या म्हणाल्या की, ” दादांच्या जाण्याने देशाची बारामती आईसारखी होती. प्रत्येक बारामतीकर हा दादांसाठी पांडुरंग होता आणि दादांसाठी बारामती श्वास होती.” म्हणून त्यांचा अखेरचा श्वासदेखील बारामतीच्या मातीत विसावला, असे सांगतनाच सुनित्रा पवार यांना गहिवरुन आले. पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, दादाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि बारामतीचा विकास करण्यासाछी मी माझे दुःख तळघरात कोंडून अत्यंत धीराने आपल्या सर्वांसाठी बाहेर पडले हा धीर बारामतीकरांकडे बघूनच आला आहे. तुमची साथ ही माझी शक्ती आहे.

दादांच्या मागे ही पहिली निवडणूक असल्याचे सांगत सुनेत्रा पवार म्हणाल्या, “ही निवडणूक श्रद्धांजली वाहण्याची संधी आहे. पवार साहेब यांनी दृष्टिकोन दिला आणि दादांनी त्यात रंग भरला.” त्यांनी स्पष्ट केले की, “दादांची जागा कोणीच घेऊ शकत नाही, पण त्यांचा विकासाचा वारसा पुढे घेऊन जाणार आहे. दादांचा एकही शब्द खाली पडू देणार नाही.” सुनेत्रा पवार म्हणाल्या, “प्रत्येक बारामतीकर माझ्या कुटुंबाचा सदस्य आहे. अनेकांचे मनोबल खचले आहे, पण एकही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही. दादांचा जनता दरबार सुरू राहणार आहे तसेच उर्वरित आयुष्य विकासकामांसाठी समर्पित असल्याचे सांगितले.

आपल्या भाषणात त्यांनी शरद पवार यांचा उल्लेख करत म्हटले, “मी शरद पवारांची सून आहे आणि दादांची पत्नी राहिले आहे.” महायुती आणि मित्रपक्षांचे आभार मानत त्यांनी सांगितले, “बारामती माझ्यासाठी फक्त मतदारसंघ नाही, तर माझी ओळख आहे. दादांनी पेरलेले विकासाचे झाड आपण वाढवायचे आहे. ही निवडणूक माझी नसून बारामतीकरांची आहे.”सुनेत्रा पवार यांनी बारामतीकरांना आवाहन केले की, “दादांना जी साथ दिली त्यापेक्षा जास्त साथ द्याल, अशी मला अपेक्षा आहे.” असं सुनेत्रा पवार यांनी सांगितले.

Back to top button