राजकीय

बारामती विधानसभा पोटनिवडणूक : माळेगाव येथे मतदान जनजागृतीला उत्स्फूर्त प्रतिसाद

कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये २०० विद्यार्थ्यांनी घेतली मतदानाची शपथ

बारामती विधानसभा पोटनिवडणूक : माळेगाव येथे मतदान जनजागृतीला उत्स्फूर्त प्रतिसाद

कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये २०० विद्यार्थ्यांनी घेतली मतदानाची शपथ

बारामती वार्तापत्र 

निवडणूक निर्णय अधिकारी उत्तम दिघे व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी स्वप्निल रावडे यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माळेगाव येथील अनंतराव पवार शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत मतदान जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला, या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना, शिक्षकांना व कर्मचाऱ्यांना मतदानाचे महत्त्व, लोकशाहीतील भूमिका तसेच मतदानाचा हक्क बजावण्याची जबाबदारी याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी तालुका प्रचार प्रसिद्धीप्रमुख सविता खारतोडे, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे गटनिदेशक संतोष सपकाळ तसेच निवास काळे उपस्थित होते. संस्थेतील सर्व शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.
यावेळी सुमारे ३५० विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी एकत्रितपणे मतदानाची शपथ घेत “आम्ही सर्वजण मतदान करणार असा निर्धार केला.
शिवनगर येथील विद्या प्रसारक मंडळाच्या कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात सुमारे २०० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत मतदानाची शपथ घेतली. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मतदानाचे महत्त्व पटवून देत लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात आले.
तालुका प्रचार प्रसिद्धीप्रमुख सविता खारतोडे यांच्या समन्वयातून आयोजित या कार्यक्रमात कॉलेजचे प्राचार्य डॉ. आर. बी. जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच प्राध्यापिका नदिया सय्यद, स्नेहल जमदाडे, किशोरी जगताप, प्राध्यापक बडे सर, शिंदे सर, कर्मचारी वर्ग यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी मतदानाचा हक्क बजावण्याची शपथ घेत लोकशाही बळकटीसाठी योगदान देण्याचा निर्धार व्यक्त केला.

Back to top button