स्थानिक
बारामती उप प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत वाहन मालकांना अटकावून ठेवलेली वाहने 23 एप्रिल पर्यंत सोडवून घेण्याचे आवाहन
अटकावून ठेवलेली 20 वाहने

बारामती उप प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत वाहन मालकांना अटकावून ठेवलेली वाहने 23 एप्रिल पर्यंत सोडवून घेण्याचे आवाहन
अटकावून ठेवलेली 20 वाहने
बारामती वार्तापत्र
बारामती उप प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत दंड तसेच कर भरल्यामुळे अटकावून ठेवलेली 20 वाहने 23 एप्रिल 2026 पर्यंत सोडवून घ्यावीत. या वाहनांची यादी कार्यालयाच्या सूचना फलकांवर तसेच तसेच परिवहन विभागाच्या www.mstcecommerce.com या संकेत स्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
विहीत मुदतीत वाहनांचा ताबा न घेतल्यास या वाहनांच्या जाहीर लिलाव धातू भंगार व व्यापार महामंडळमार्फत www.mstcecommerce.com या संकेतस्थळावर 23 एप्रिल रोजी करण्यात येईल. अधिक माहितीकरिता कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही उप प्रादेशिक अधिकारी सुरेंद्र निकम यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.






