राजकीय

बारामतीत प्रचाराला रंगत; आदिती तटकरे यांचे रात्री उशिरा आगमन,भिगवण रस्त्यावर चहाच्या पित नागरिकांशी संवाद

शहरातील मूलभूत सुविधा आणि स्थानिक प्रश्न जाणून घेण्याचा प्रयत्न

बारामतीत प्रचाराला रंगत; आदिती तटकरे यांचे रात्री उशिरा आगमन,भिगवण रस्त्यावर चहाच्या पित नागरिकांशी संवाद

शहरातील मूलभूत सुविधा आणि स्थानिक प्रश्न जाणून घेण्याचा प्रयत्न

बारामती वार्तापत्र 

बारामतीत विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण दिवसेंदिवस तापत असताना, सुनेत्रावहिनींच्या प्रचाराच्या शुभारंभ सभेपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आदिती तटकरे यांनी बारामतीत आगमन करत वेगळ्या पद्धतीने प्रचाराची सुरुवात केली. आज रात्री उशिरा बारामतीत दाखल झाल्यानंतर त्यांनी कोणताही औपचारिक कार्यक्रम न करता थेट भिगवण रस्त्यावर थांबत चहाचा आस्वाद घेत स्थानिक नागरिकांशी मनमोकळा संवाद साधला.

साध्या आणि अनौपचारिक वातावरणात झालेल्या या भेटीत आदिती तटकरे यांनी नागरिकांच्या दैनंदिन समस्या, शहरातील मूलभूत सुविधा आणि स्थानिक प्रश्न जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या अचानक भेटीमुळे परिसरात उत्सुकता निर्माण झाली असून नागरिकांनीही त्यांच्याशी थेट संवाद साधत आपली मते मांडली.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सचिन सातव यांच्यासह शहरातील काही नगरसेवक आणि पदाधिकारी उपस्थित होते. प्रचाराच्या शुभारंभाआधीच आदिती तटकरे यांनी घेतलेला हा साधा, लोकाभिमुख संवाद राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.

Back to top button