क्राईम रिपोर्ट

बारामती शहर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; दोन पिकअपसह चार गोवंश जनावरे ताब्यात

गुणवडी रोडवर बेकायदेशीर गोवंश वाहतुकीचा पर्दाफाश; संबंधितांवर गुन्हा दाखल

बारामती शहर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; दोन पिकअपसह चार गोवंश जनावरे ताब्यात

गुणवडी रोडवर बेकायदेशीर गोवंश वाहतुकीचा पर्दाफाश; संबंधितांवर गुन्हा दाखल

बारामती वार्तापत्र 

बारामती शहर पोलिसांनी गोवंश संरक्षणासाठी पुन्हा एकदा धडाकेबाज कारवाई केली आहे. गुणवडी रोड परिसरात दोन पिकअप वाहनांमधून बेकायदेशीररीत्या वाहतूक करण्यात येणारी चार गोवंश जनावरे ताब्यात घेण्यात आली आहेत. जनावरांची अमानुष पद्धतीने वाहतूक होत असल्याचे तपासात समोर आले असून याप्रकरणी संबंधित चालक व जनावरांचा व्यवहार करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जानेवारी २०२६ पासून सुरू असलेल्या विशेष मोहिमेत बारामती शहर पोलिसांनी आतापर्यंत ४१ गोवंश जनावरे मुक्त करून सुरक्षित गोशाळांमध्ये दाखल केली आहेत. गोवंश संरक्षणासाठी ‘झिरो टॉलरन्स’ धोरण स्वीकारत अशा प्रकारच्या बेकायदेशीर कृत्यांवर भविष्यातही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

Back to top button