बारामतीतील नुकसानग्रस्त भागांची जयदादा पवारांकडून पाहणी, प्रशासनाला दिले निर्देश
लवकरात लवकर नवीन वृक्षारोपण करण्याचे निर्देश

बारामतीतील नुकसानग्रस्त भागांची जयदादा पवारांकडून पाहणी, प्रशासनाला दिले निर्देश
लवकरात लवकर नवीन वृक्षारोपण करण्याचे निर्देश
बारामती वार्तापत्र
बारामतीमध्ये काल झालेल्या वादळी पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे शहरातील अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात झाडे उन्मळून पडली असून पर्यावरणाचे नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच जयदादा पवार यांनी तात्काळ बारामतीत येत नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली.
यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून नुकसानीची माहिती घेतली आणि बारामती नगरपालिका प्रशासनाला आवश्यक सूचना दिल्या. पडलेल्या झाडांची तातडीने विल्हेवाट लावण्यासोबतच त्या ठिकाणी लवकरात लवकर नवीन वृक्षारोपण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. शहराचे हरित वैभव अबाधित राखण्यासाठी प्रशासनाने तत्परतेने काम करावे, असेही जयदादा पवार यांनी यावेळी सांगितले.
वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीनंतर नागरिकांच्या सुरक्षेसह पर्यावरण संवर्धनावर भर देण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.






