सभागृहात ‘किरणांचा प्रकाश’; स्वीकृत नगरसेवकांच्याअधिकारांवरून खडाजंगी स्वीकृत नगरसेवकांचा सवाल
विकासकामांच्या चर्चेपेक्षा अधिकारांच्या मुद्यावरच अधिक वेळ खर्च झाल्याचे चित्र पाहायला

सभागृहात ‘किरणांचा प्रकाश’; स्वीकृत नगरसेवकांच्याअधिकारांवरून खडाजंगी स्वीकृत नगरसेवकांचा सवाल
विकासकामांच्या चर्चेपेक्षा अधिकारांच्या मुद्यावरच अधिक वेळ खर्च झाल्याचे चित्र पाहायला
बारामती वार्तापत्र
विकासकामे आणि प्रलंबित प्रश्नांवरून बारामती नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत स्वीकृत व लोकनियुक्त नगरसेवकांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. यावेळी स्वीकृत नगरसेवकांच्या अधिकारांचा मुद्दा ऐरणीवर आला आणि चर्चेदरम्यान ज्येष्ठ माजी स्वीकृत नगरसेवक गेली पंधरा वर्षांपासून काम करत होते यांचे नाव चर्चेच्या केंद्रस्थानी आले.
सभागृहात काही सदस्यांनी स्वीकृत नगरसेवकांच्या प्रश्न उपस्थित करण्याच्या अधिकारावर आक्षेप घेतल्याने वातावरण तापले. त्यावर स्वीकृत नगरसेवकांनी जोरदार भूमिका घेत, “यापूर्वी सभागृहात गेली 15 वर्षे स्वीकृत नगरसेवक सभागृहात विविध विषयांवर प्रश्न उपस्थित करत होते. मग आम्ही नागरिकांचे प्रश्न मांडले तर त्यात गैर काय?” असा थेट सवाल उपस्थित केला.
स्वीकृत नगरसेवकांनी नागरिकांच्या समस्या, रखडलेली विकासकामे आणि प्रशासनाच्या कामकाजाबाबत सभागृहात आवाज उठवणे हे आपले कर्तव्य असल्याचे सांगत, स्वीकृत सदस्यांचे अधिकार आणि जबाबदाऱ्या सभागृहाने स्पष्ट कराव्यात, अशी मागणी केली.
या मुद्द्यावरून गटनेते संजय संघवी यांच्यात काही काळ दोन्ही बाजूंमध्ये शाब्दिक खडाजंगी झाली. विकासकामांच्या चर्चेपेक्षा अधिकारांच्या मुद्यावरच अधिक वेळ खर्च झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
अखेर अध्यक्षस्थानी असलेल्या पदाधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करून चर्चा आटोक्यात आणली.
सभागृहातील या चर्चेनंतर “पूर्वी चालत होते मग आम्ही का नाही?” हा मुद्दा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला असून, स्वीकृत नगरसेवकांच्या अधिकारांबाबत नव्याने चर्चा सुरू झाली आहे.






