उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची अजितदादांच्या स्मृतिस्थळाला भावपूर्ण आदरांजली
बारामतीच्या विकासासाठी त्यांनी दाखविलेल्या दूरदृष्टीचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची अजितदादांच्या स्मृतिस्थळाला भावपूर्ण आदरांजली
बारामतीच्या विकासासाठी त्यांनी दाखविलेल्या दूरदृष्टीचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
बारामती वार्तापत्र
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी रविवारी बारामती दौऱ्यादरम्यान सकाळी विद्या प्रतिष्ठान परिसरातील दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्मृतिस्थळाला भेट देत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. स्मृतिस्थळासमोर नतमस्तक होत त्यांनी पुष्पचक्र अर्पण करून अजितदादांच्या स्मृतींना अभिवादन केले.
यावेळी परिसरात भावनिक वातावरण निर्माण झाले होते. उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनीही स्मृतिस्थळी पुष्प अर्पण करून अजितदादांना आदरांजली वाहिली. अजित पवार यांनी बारामतीच्या विकासासाठी दिलेले योगदान, जनतेशी असलेले त्यांचे जिव्हाळ्याचे नाते आणि राज्याच्या राजकारणातील त्यांचे नेतृत्व याची उपस्थितांनी आठवण काढली.
अजित पवार यांच्या दुर्दैवी विमान अपघाताला आज सुमारे पाच महिने पूर्ण झाले आहेत. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती विमानतळाजवळ झालेल्या अपघातात त्यांचे निधन झाले होते. त्यांच्या निधनानंतर विद्या प्रतिष्ठान येथे स्मृतिस्थळ उभारण्यात आले असून, अनेक मान्यवर आणि नागरिक तेथे भेट देऊन अभिवादन करत असतात.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी स्मृतिस्थळाला भेट देऊन अजितदादांच्या कार्याला अभिवादन केले. बारामतीच्या विकासासाठी त्यांनी दाखविलेल्या दूरदृष्टीचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.






