स्थानिक

उद्या जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर; जिल्हाधिकाऱ्यांनी दिले घराबाहेर न पडण्याचे निर्देश

जिल्हा प्रशासनाने नागरिकांनाही सतर्क राहण्याचे आवाहन

उद्या जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर; जिल्हाधिकाऱ्यांनी दिले घराबाहेर न पडण्याचे निर्देश

जिल्हा प्रशासनाने नागरिकांनाही सतर्क राहण्याचे आवाहन

बारामती वार्तापत्र 

हवामान विभागाने ६ जुलै २०२६ रोजी पुणे जिल्ह्यासाठी ‘रेड अलर्ट’ जारी केल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. संभाव्य अतिवृष्टीचा धोका लक्षात घेऊन विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी जिल्ह्यातील सर्व शाळांना सोमवारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी ही माहिती देत, हवामानाचा अंदाज आणि नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले. मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेता शाळा बंद ठेवण्याचे आदेश संबंधित यंत्रणांना देण्यात आले आहेत.

जिल्हा प्रशासनाने नागरिकांनाही सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळावे, नदी, नाले आणि इतर धोकादायक ठिकाणांपासून सुरक्षित अंतर ठेवावे, तसेच स्थानिक प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, जिल्हा प्रशासनाने सर्व संबंधित यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या असून, आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी आवश्यक तयारी करण्यात आली आहे.

Back to top button