स्थानिक

वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची प्रशासनाला तत्काळ सूचना

पावसाच्या पार्श्वभूमीवर सुविधा, सुरक्षा आणि नियोजनाबाबत अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याचे निर्देश

वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची प्रशासनाला तत्काळ सूचना

पावसाच्या पार्श्वभूमीवर सुविधा, सुरक्षा आणि नियोजनाबाबत अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याचे निर्देश

बारामती वार्तापत्र 

राज्यात सुरू असलेल्या संतांच्या पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी संबंधित प्रशासनाशी संपर्क साधून आवश्यक सूचना दिल्या.
सध्या अनेक भागांत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वारकऱ्यांच्या मुक्काम, वाहतूक आणि मूलभूत सुविधांवर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यांनी प्रशासनाला अधिक दक्ष राहण्याच्या सूचना केल्या. वारकऱ्यांना पिण्याचे पाणी, आरोग्य सेवा, स्वच्छता, निवारा आणि वाहतूक व्यवस्थेत कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.

तसेच पालखी मार्गावरील परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवावे, पावसामुळे उद्भवणाऱ्या अडचणींवर तातडीने कार्यवाही करावी आणि वारकऱ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असेही त्यांनी प्रशासनाला सांगितले.आषाढी वारीसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी पायी पंढरपूरकडे जात असताना, त्यांच्या सेवेत कोणतीही त्रुटी राहू नये, यासाठी प्रशासनाने समन्वयाने काम करण्याची अपेक्षाही उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केली.

Back to top button