बारामतीत अदिती तटकरेंकडून अजितदादांना अभिवादन; पूर्णाकृती पुतळ्याचे दर्शन, छायाचित्र दालनाला भेट
तटकरे यांनी प्रदर्शनातील प्रत्येक विभागाची बारकाईने पाहणी करत अनेक छायाचित्रांविषयी माहिती जाणून घेतली.

बारामतीत अदिती तटकरेंकडून अजितदादांना अभिवादन; पूर्णाकृती पुतळ्याचे दर्शन, छायाचित्र दालनाला भेट
तटकरे यांनी प्रदर्शनातील प्रत्येक विभागाची बारकाईने पाहणी करत अनेक छायाचित्रांविषयी माहिती जाणून घेतली.
बारामती वार्तापत्र
राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी बारामती दौऱ्यादरम्यान दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी नटराज कला नाट्य मंदिर येथे उभारण्यात आलेल्या अजितदादा पवार यांच्या छायाचित्र संग्रह दालनाला भेट देत त्यांच्या सार्वजनिक, राजकीय आणि विकासाभिमुख कार्याचा आढावा घेतला.
अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त बारामतीत विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि स्मरण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, त्याच पार्श्वभूमीवर अदिती तटकरे यांनी या स्मृतिस्थळाला भेट दिली.
छायाचित्र दालनात अजितदादा पवार यांच्या राजकीय प्रवासातील महत्त्वाचे टप्पे, विकासकामे, सामाजिक उपक्रम तसेच विविध राष्ट्रीय व राज्यस्तरीय मान्यवरांसोबतचे दुर्मीळ क्षण छायाचित्रांच्या माध्यमातून साकारण्यात आले आहेत. तटकरे यांनी प्रदर्शनातील प्रत्येक विभागाची बारकाईने पाहणी करत अनेक छायाचित्रांविषयी माहिती जाणून घेतली.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी त्यांना छायाचित्र दालनाची संकल्पना आणि विविध विभागांची माहिती दिली. अजितदादा पवार यांच्या कार्याचा प्रेरणादायी प्रवास जतन करणारा हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे मत अदिती तटकरे यांनी व्यक्त केले.
यावेळी अजितदादा यूथ फाऊंडेशनचे पदाधिकारी, स्थानिक मान्यवर, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.







