स्थानिक

अजितदादांच्या जयंतीनिमित्त ११ हजार वृक्षांचे वाटप; ‘दादांना हरित मानवंदना’

बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा पर्यावरण संवर्धनाचा उपक्रम; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

अजितदादांच्या जयंतीनिमित्त ११ हजार वृक्षांचे वाटप; ‘दादांना हरित मानवंदना’

बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा पर्यावरण संवर्धनाचा उपक्रम; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

बारामती वार्तापत्र

दिवंगत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने ‘दादांना हरित मानवंदना’ या संकल्पनेतून पर्यावरण संवर्धनाचा प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत ११ हजार मोफत वृक्षरोपांचे वाटप करण्यात आले असून, नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत हरित बारामतीच्या संकल्पनेला पाठिंबा दिला.

या उपक्रमात फळझाडे, सावलीची झाडे तसेच विविध पर्यावरणपूरक वृक्षांची रोपे नागरिकांना मोफत वितरित करण्यात आली. “वृक्ष लावा, वृक्ष जगवा” हा संदेश देत प्रत्येकाने किमान एक तरी वृक्ष लावून त्याचे संगोपन करावे, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी लोकसहभाग अत्यावश्यक असल्याचे आवाहन करण्यात आले.

अजितदादा पवार यांनी आपल्या सार्वजनिक जीवनात विकासकामांसोबतच पर्यावरण संवर्धनाला नेहमीच प्राधान्य दिले. वृक्षलागवड, हरित उपक्रम, जलसंधारण आणि स्वच्छतेसाठी त्यांनी सातत्याने पुढाकार घेतला होता. त्यांच्या याच विचारांना अभिवादन म्हणून राबविण्यात आलेल्या या उपक्रमात मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेत वृक्षरोपे स्वीकारली आणि त्यांचे संवर्धन करण्याचा संकल्प केला.

उपस्थितांनी हरित बारामतीच्या दिशेने उचललेले हे महत्त्वाचे पाऊल असल्याची भावना व्यक्त केली. पर्यावरण संरक्षणाबरोबरच सामाजिक बांधिलकीची जाणीव करून देणाऱ्या या उपक्रमाचे विविध स्तरांतून स्वागत आणि कौतुक होत असून, अजितदादा पवार यांच्या पर्यावरणप्रेमाला हीच खरी ‘हरित मानवंदना’ असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.

Back to top button

दिवंगत लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..! त्यांच्या कार्याला, दूरदृष्टीला आणि जनसेवेच्या अविस्मरणीय योगदानाला सादर प्रणाम.

https://youtu.be/y0HjjzvjpNM?si=ZKAYhb_IBjh73M7D