अखेर राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य मंगेश जगताप यांच्याविरुद्ध गुन्हा;अटकेसाठी पोलिसांची पथके रवाना
पुण्यातील बंड गार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता.

अखेर राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य मंगेश जगताप यांच्याविरुद्ध गुन्हा;अटकेसाठी पोलिसांची पथके रवाना
पुण्यातील बंड गार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता.
बारामती वार्तापत्र
पुणे जिल्हा परिषदेत दोन दिवसांपूर्वी घडलेल्या खळबळजनक घटनेनंतर बारामती तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे जिल्हा परिषद सदस्य मंगेश जगताप यांच्याविरुद्ध अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचा तसेच वारंवार लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणी माळेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित महिलेच्या तक्रारीवरून सुरुवातीला पुण्यातील बंड गार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता.
मात्र, कथित घटना माळेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने पुढील तपासासाठी हा गुन्हा माळेगाव पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे. या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसांपूर्वी पीडित महिलेने पुणे जिल्हा परिषद परिसरात स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला होता.
या घटनेनंतर तिने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. या गुन्ह्याचा तपास माळेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ करत आहे. जगताप यांच्या अटकेसाठी विशेष पोलिस पथके रवाना करण्यात आल्याची माहिती पोलिस प्रशासनाने दिली आहे.
——–
मंगेश जगताप यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकणी तपास पथके रवाना केली आहे. —- चैतन्य कदम उपविभागीय पोलिस अधिकारी बारामती
———-







