स्थानिक

बारामती नगरपरिषद कामगार पतसंस्थेच्या चेअरमनपदी फिरोज आत्तार; व्हाईस चेअरमनपदी उमेश लालबिगे यांची बिनविरोध निवड!

३.४१ कोटींचे भागभांडवल, ५.६८ कोटींचे कर्जवाटप

बारामती नगरपरिषद कामगार पतसंस्थेच्या चेअरमनपदी फिरोज आत्तार; व्हाईस चेअरमनपदी उमेश लालबिगे यांची बिनविरोध निवड!

३.४१ कोटींचे भागभांडवल, ५.६८ कोटींचे कर्जवाटप

✍️ बारामती वार्तापत्र 

बारामती नगरपरिषद कामगार सहकारी पतसंस्था मर्यादितच्या चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाची निवडणूक प्रक्रिया उत्साहपूर्ण आणि सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडली. चेअरमनपदी श्री. फिरोज महामुद आत्तार, तर व्हाईस चेअरमनपदी श्री. उमेश दिलीप लालबिगे यांची सर्वानुमते अविरोध निवड करण्यात आली.

सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, बारामती तथा अध्यासी अधिकारी श्री. प्रमोद पं. दुरगुडे यांच्या अध्यक्षतेखाली व मार्गदर्शनाखाली सहाय्यक निबंधक कार्यालयात ही निवड प्रक्रिया सुरळीतपणे पार पडली.

४७ वर्षांची विश्वासाची वाटचाल!

१८ एप्रिल १९७९ रोजी स्थापन झालेल्या या पतसंस्थेने सभासदांच्या विश्वासाच्या बळावर यशस्वी वाटचाल केली आहे. ३१ मार्च २०२६ अखेर संस्थेचे भागभांडवल ३ कोटी ४१ लाख ६५ हजार रुपये, तर सभासदांना तब्बल ५ कोटी ६८ लाख ४२ हजार ३५३ रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले आहे. आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेली ही संस्था कामगारांच्या हितासाठी सातत्याने कार्यरत आहे.

संचालक मंडळाची भक्कम साथ

या वेळी संस्थेच्या संचालक मंडळातील श्री. फिरोज महामुद आत्तार, श्री. उमेश दिलीप लालबिगे, श्री. दादासाहेब वसंत जोगदंड, श्रीमती सुवर्णा प्रभाकर भापकर, श्री. भालचंद्र प्रल्हाद ढमे, श्री. विजय लक्ष्मण शितोळे, श्री. अजय प्रकाश लालबिगे, श्रीमती प्रतिभा मनोज सोनवणे, श्री. अरुण एकनाथ थोरात, श्री. संजय गजानन प्रभुणे, श्री. हर्षल रतन इंगुले, श्री. भारत विठोबा गदाई आणि श्री. भाऊसाहेब रामचंद्र झेंडे यांची उपस्थिती होती.

तसेच संस्थेचे माजी चेअरमन तथा बारामती नगरपरिषदेचे नगरसेवक श्री. राजेंद्र (नाना) सोनवणे, सचिव व लिपिक उपस्थित होते.

नवनिर्वाचित चेअरमन फिरोज आत्तार आणि व्हाईस चेअरमन उमेश लालबिगे यांनी सर्व संचालक मंडळ, माजी पदाधिकारी आणि सभासदांचे आभार मानले. संस्थेची उज्ज्वल परंपरा कायम ठेवत सभासदांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि हितासाठी काम करण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

निवडीनंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. अविरोध निवडीमुळे संस्थेच्या सभासदांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

ठळक मुद्दे

🔹 चेअरमन : फिरोज महामुद आत्तार
🔹 व्हाईस चेअरमन : उमेश दिलीप लालबिगे
🔹 दोन्ही निवडी अविरोध
🔹 संस्थेची स्थापना : १८ एप्रिल १९७९
🔹 भागभांडवल : ₹३.४१ कोटी
🔹 कर्जवाटप : ₹५.६८ कोटी

Back to top button